Nashik Crime: आधी 6 वर्षाच्या चिमुकलीला संपवलं, नंतर पित्यानेही मृत्यूला कवटाळलं, नाशिकमध्ये हळहळ

Nashik News: स्वप्निल गायकवाड यांचा गेल्या वर्षी  पत्नीसोबत घटस्फोट झाला होता. त्यानंतर ते प्रचंड मानसिक तणावात होते अशी चर्चा आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

नाशिक: नाशिकमधून एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. नाशिकच्या जेलरोड परिसरात एका पोलीस शिपायाने आपल्या सहा वर्षांच्या चिमुकलीची हत्या करत स्वतःही आयुष्य संपवल्याची घटना घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मानसिक तणावातून हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचं सांगण्यात येत असून पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.

'मी बापाचं ऐकत नाही, पण मित्रांचं ऐकतो, त्यांच्याशी शरीरसंबंध ठेव'; पत्र्याच्या शेडमध्ये तिघांकडून मुलीचं लैंगिक शोषण

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार,  नाशिकच्या जेलरोड परिसरात एका पोलीस शिपायाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे हे टोकाचं पाऊल उचलण्याआधी त्याने आपल्या सहा वर्षांच्या चिमुकलीची हत्याही केली. स्वप्निल गायकवाड (वय,  36) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.  मंगळवारी (ता. 24 जून) सायंकाळी मॉडेल कॉलनीतील योगमाला अपार्टमेंटमध्ये उपनगर पोलीस ठाण्यात कार्यरत 36 वर्षीय पोलीस शिपाई स्वप्निल गायकवाड याने प्रथम त्यांच्या सहा वर्षीय भैरवीला नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास देऊन तिचा खून केला.

त्यानंतर पंख्याला दोरी बांधत गळफास घेत स्वतःचेही आयुष्य संपवले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून पोलीस दलावरही शोककळा पसरली आहे. मयत स्वप्निल गायकवाड यांचा गेल्या वर्षी  पत्नीसोबत घटस्फोट झाला होता. त्यानंतर ते प्रचंड मानसिक तणावात होते अशी चर्चा आहे. घटनास्थळी नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती, पुढील तपास नाशिकरोड पोलीस करत आहेत.

Jalgaon Crime: वाळू माफियांची दादागिरी! महसूल विभागाच्या पथकाला अडवून मारहाण

Topics mentioned in this article