Nashik News : नाशिक म्हाडा भूखंड अपहार प्रकरणी सर्वात मोठी कारवाई, सोनू मनवानीला अटक, 15 बड्या व्यवसायीकांनी..

नाशिकमध्ये म्हाडा भूखंड अपहार प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली होती.याप्रकरणी नाशिक पोलिसांनी धडक कारवाई करत बांधकाम व्यावसायिक सोनू मनवानीला अटक केली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Nashik Mhada Land Acquisition Case

राहूल वाघ, प्रतिनिधी

Nashik Crime News Today : नाशिकमध्ये म्हाडा भूखंड अपहार प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली होती.याप्रकरणी नाशिक पोलिसांनी धडक कारवाई करत बांधकाम व्यावसायिक सोनू मनवानीला अटक केली आहे.पोलिसांनी आरोपी सोनूला न्यायालयात हजर केले. दरम्यान, न्यायालयाने आरोपीला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. म्हाडा भूखंड प्रकरणात अनेक अनियमितता झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. नाशिकमधील जवळपास 15 मोठ्या बांधकाम व्यवसायिकांनी फसवणूक केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, म्हाडा भूखंड अपहार प्रकरणी बांधकाम व्यावसायिक सोनू मनवानीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.नाशिक पोलिसांनी म्हाडा भूखंड प्रकरणात ही पहिली अटकेची कारवाई केली आहे. आरोपीला नाशिक कोर्टात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, नाशिकच्या इतर बड्या बांधकाम व्यावसायिकांवर अटकेची टांगती तलवार कायम आहे. 

Advertisement

नक्की वाचा >> Pune News: पुण्यात गॅस सिलेंडरचे वितरण फक्त 'या' माध्यमातूनच होणार, किती तासांत घरपोच होणार? वाचा सर्व डिटेल्स

108 प्रकरणांतील कागदपत्रांची तपासणी

नाशिक पोलिसांचे 18 पथक म्हाडा भूखंड प्रकरणी अधिक तपास करत आहेत. महसूल आणि पोलीस पथकाकडून 108 प्रकरणातील कागदपत्रांची पडताळणी सुरू असल्याची माहिती भूमी अभिलेख यांनी दिली आहे. भूमी अभिलेख,महसूल विभाग आणि पोलीस पथक संयुक्तरित्या कारवाई करत असून या प्रकरणातील कागदपत्रांची सखोल तपासणी सुरु आहे. या प्रकरणात आणखी काही मोठ्या बांधकाम व्यावसायिकांनाही अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  मुळे आगामी काळात या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. 

नक्की वाचा >> Pune News : पुण्यातील फिश मार्केटमध्ये झालाय मोठा बदल! 'हा' मासा विकला जातोय प्रति किलो 1900 रुपये, कारण..

Topics mentioned in this article