Nashik News: त्र्यंबकेश्वरच्या बेपत्ता विद्यार्थ्यासोबत घडलं खूप भयंकर, नाशिककरांच्या पायाखालची वाळूच सरकली

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पिंपरी परिसरात एका विद्यार्थ्याच्या आत्महत्येची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Nashik Missing Student Death News

राहुल वाघ, प्रतिनिधी

Nashik Student Death News : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पिंपरी परिसरात एका विद्यार्थ्याच्या आत्महत्येची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.13 मार्चपासून बेपत्ता असलेल्या विद्यार्थ्याचा मृतदेह आश्रम शाळेच्या मागील बाजूस असलेल्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला. विद्यार्थ्याने झाडाला गळफास लावून स्वत:चं आयुष्य संपवलं. या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.संजय सदू नडगे असं मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पिंपरी येथील स्व.मधुकरराव हिरे अनुदानित आश्रम शाळेत दहावीचे शिक्षण घेत होता. 

झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला विद्यार्थ्याचा मृतदेह 

मागील दोन दिवसांपासून संजय बेपत्ता असल्याची माहिती समोर आली होती. विद्यार्थ्याचा शोध सुरू असताना आश्रम शाळेच्या मागील बाजूस असलेल्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला.ही माहिती मिळताच त्र्यंबकेश्वर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह खाली उतरवून पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. या घटनेमुळे आश्रम शाळा परिसरात तसेच गावात शोककळा पसरली आहे.

Advertisement

नक्की वाचा >> Pune News : पुण्यात पुन्हा एका वैष्णवीची आत्महत्या! अवघ्या 8 महिन्यात नवविवाहित महिलेनं जीवन संपवलं, कारण काय?

दरम्यान,विद्यार्थ्याने आत्महत्या नेमक्या कोणत्या कारणामुळे केली, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. या प्रकरणामागे कौटुंबिक कारण,शैक्षणिक ताण की इतर काही कारण आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. तसेच काही स्थानिकांकडून जातीय कारणांचा संशयही व्यक्त करण्यात येत असून पोलिसांकडून चौकशी केली जात आहे.या घटनेमुळे आश्रम शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.

नक्की वाचा >> Pune News: आनंदाची बातमी! पुणे शहरात आता 'नो ट्रॅफिक' जॅम, CM फडणवीसांची मेट्रोबाबत सर्वात मोठी घोषणा