
प्रथमेश गडकरी
आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश करण्यात नवी मुंबई पोलिसांना यश आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे हे रॅकेच दोन पोलिस आणि एक कस्टमचा अधिकारी आपल्या सहकाऱ्यांसह चालवत होते. नवी मुंबई गुन्हे शाखेने एका मोठ्या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा भांडाफोड करत 10 जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये 2 पोलीस हवालदार, 1 कस्टम अधीक्षक आणि अन्य सहा आरोपींचा समावेश आहे. या रॅकेटचा भांडाफोड बांधकाम व्यावसायिक गुरुनाथ चिचकर यांच्या आत्महत्येनंतर सुरू झालेल्या तपासातून झाला. हे रॅकेच समोर आल्यानंतर पोलीस अधिकारी ही चक्रावून गेले आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
बांधकाम व्यावसायिक गुरुनाथ चिचकर यांनी काही दिवसांपूर्वी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती. त्यांच्या सुसाईड नोटमध्ये नवी मुंबई अंमली पदार्थ विरोधी पथकातील अधिकाऱ्यांनी मानसिक त्रास दिल्याचा त्यांनी आरोप केला होता. या आरोपांची गंभीर दखल नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी घेतली. त्यानंतर त्यांनी विशेष तपास पथक (SIT) ही स्थापन केले. त्यांना या प्रकरणाचा छडा लावण्याची जबाबदारी देण्यात आली होती. पण याचा तपास करताना त्याची पाळंमुळे एका आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटपर्यंत जातील असं कुणालाही वाटलं नसेल.
विशेष तपास पथकाला तपासादरम्यान काही गोष्टी समोर आल्या. हे रॅकेट थायलंडसह परदेशातून हायड्रो गांजा भारतात आयात करत होते. त्यानंतर तो मुंबई आणि नवी मुंबईत आणला जायचा. त्याचा साठा ही नवी मुंबईत केला जात होता. तिथूनच तो गांडा संपूर्ण देशात वितरित केला जात होता. पोलिसांनी या प्रकरणी हायड्रो गांजा जप्त केला आहे. शिवाय या प्रकरणात एकूण जप्त मालमत्ता ही जवळपास 74 लाखांची आहे.
या प्रकरणी नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात समोर आले की, खारघर पोलीस ठाण्यातील हवालदार सचिन भालेराव याचा गुरुनाथ चिचकर यांच्याशी सातत्याने संपर्क होता. तपासाची कल्पना लागताच तो मूळ गावी पळून गेला होता. मात्र गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला तिथून अटक केली. या प्रकरणी पोलीस हवालदार सचिन भालेराव, पोलीस हवालदार संजय फुलकर आणि कस्टम अधीक्षक प्रशांत गौर यांना अटक केली आहे. अशी माहिती नवी मुंबईचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी दिली आहे.
नेरूळला गांज्याची विक्री होत आहे, नवी मुंबई पोलिसांना समजले होते. तिथे तिघे जण होते. त्या पैकी एक जण फरार झाला. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर बरीच माहिती समोर आली. हे ड्रग्ड अमेरिका किंवा थायलंड वरून मागवले जात होते. ते एअरपोर्टवर आल्यानंतर तिथे कस्टमचा माणूस ते क्लिअर करत असे. नंतर त्याचा ताबा एजंटला दिला जात असे. पुढे ते ड्रग्ज पैसे देणाऱ्या माफियांना दिले जात. नंतर त्याचे वितरण देशात वेगवेगळी लोकं करत होती हे या चौकशीत समोर आले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world