जाहिरात

Navi Mumbai Airport : नवी मुंबई विमानतळाबाबत मोठी अपडेट; पहिल्या टप्प्यात ही 5 शहरे जोडली जाणार

एअर इंडिया एक्सप्रेस या विमानतळावरुन दररोज पाच मेट्रो शहरांसाठी उड्डाणं सुरू करणार आहेत.

Navi Mumbai Airport : नवी मुंबई विमानतळाबाबत मोठी अपडेट; पहिल्या टप्प्यात ही 5 शहरे जोडली जाणार

Navi Mumbai International Airport : लवकरच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रवाशांसाठी सुरू होणार आहे. या विमानतळावरुन आंतरराष्ट्रीय विमान उड्डाण करणार असल्याची चर्चा असताना एक चांगली बातमी समोर आली आहे. एअर इंडिया एक्सप्रेस या विमानतळावरुन दररोज पाच मेट्रो शहरांसाठी उड्डाणं सुरू करणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली, बंगळुरू, चेन्नई, हैद्राबाद आणि कोलकाता या पाच शहरांसाठी नवी मुंबईहून थेट विमान उपलब्ध होतील. याशिवाय पहिल्या टप्प्यात १५ हून अधिक शहरांसाठी दररोज २० फ्लाइट्स ऑपरेट केले जातील. २०२६ पर्यंत विमानसेवेत वाढ करीत ५५ पर्यंत करण्यात येणार आहे. ज्यामध्ये पाच आंतरराष्ट्रीय फ्लाइट्सचा समावेश असेल. 

इंडिगो आणि अक्सा एअर या कंपन्या देखील नवी मुंबई विमानतळावरुन फ्लाइट्स ऑपरेट करणार आहेत. इंडिगोचा ३६ देशांतर्गत विमान उड्डाणं करण्याचा प्लान आहे. एका दिवसात १५ शहरामध्ये विमान सेवा सुरू करण्याच्या विचारात असलेल्या इंडिगोने मोठा बदल केला आहे. यापुढे इंडिगो दररोज १५८ विमान सेवा (Departure and arriaval) देणार असल्याची माहिती आहे. यामध्ये १४ आंतरराष्ट्रीय विमानांचं उड्डाण नवी मुंबई विमानतळावरुन होणार आहे. तर दुसरीकडे अक्सा एअर लाइनकडूम दररोज ४० विमानसेवा सुरू करण्यात येणार असून यातील ८-१० विमानं आतंरराष्ट्रीय असतील. 

Air India Viral : 'त्या' झुरळाला मरेपर्यंत फाशी! एअर इंडियाचं विमान पुन्हा एकदा चर्चेत

नक्की वाचा - Air India Viral : 'त्या' झुरळाला मरेपर्यंत फाशी! एअर इंडियाचं विमान पुन्हा एकदा चर्चेत

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू होण्याला विलंब झाला आहे. परंतू लवकरच याच्या लोकार्पणाची घोषणा होणार आहे. विमानतळ सुरू होण्याच्या एक महिन्यापूर्वी तिकीट बुकिंग सुरू होईल. बुकिंग करताना प्रवाशांना मुंबई विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे दोन पर्याय उपलब्ध असतील. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com