जाहिरात

नवी मुंबई हादरली! फ्लॅट आणि पैशांच्या वादातून महिलेवर वारंवार अत्याचार, फोटो-व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी

Navi Mumbai News: नवी मुंबईतील रबाळे एमआयडीसी परिसरात फ्लॅटच्या आर्थिक व्यवहाराचा गैरफायदा घेत 57 वर्षीय संजय काळे याने एका महिलेवर गुंगीचे औषध देऊन अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

नवी मुंबई हादरली! फ्लॅट आणि पैशांच्या वादातून महिलेवर वारंवार अत्याचार, फोटो-व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी
"Navi Mumbai News: फ्लॅटच्या वादातून महिलेवर वारंवार लैंगिक अत्याचार"
प्रतिकात्मक फोटो Canva

राहुल कांबळे, प्रतिनिधी

Navi Mumbai: फ्लॅटच्या व्यवहारातून निर्माण झालेल्या आर्थिक अडचणीचा गैरफायदा घेत एका महिलेला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार नवी मुंबईत उघडकीस आला आहे. या प्रकरणी रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात एका 57 वर्षीय व्यक्तीविरोधात बलात्कार, मारहाण आणि धमकीसह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय काळेविरोधात  (वय 57) गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपीचा शोध सुरू असून त्याला अटक करण्यात आलेली नाही.

आर्थिक अडचणीचा गैरफायदा घेऊन अत्याचार

फिर्यादी महिलेने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, हा प्रकार फेब्रुवारी 2022 ते 20 मे 2026 या कालावधीत ऐरोली आणि रबाळे येथील साई इन हॉटेल तसेच महापे एमआयडीसी परिसरातील हॉटेल श्लोक येथे घडला. आरोपी संजय काळे याने फिर्यादी महिलेला एक फ्लॅट विकला होता. आरोपीने फिर्यादीला विकलेल्या सदनिकेचे पैसे आर्थिक अडचणीमुळे परत देऊ शकत नसल्याचा फायदा घेत तिला ऐरोली येथे बोलावले. तिथे तिच्या कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध मिसळून तिला बेशुद्ध करण्यात आले, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

(नक्की वाचा : Navi Mumbai: नवी मुंबईत खळबळ! 75 कुटुंबांचं आयुष्य उद्ध्वस्त, 'त्या' शिपिंग कंपनीचा कोट्यवधींचा काळा कारनामा)

विवस्त्र फोटो काढून वारंवार ब्लॅकमेल

महिलेने तक्रारीत नमूद केले आहे की, ती बेशुद्ध झाल्यानंतर आरोपीने तिला साई इन हॉटेलमध्ये नेले आणि तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले. एवढेच नाही तर बेशुद्ध अवस्थेत असताना तिचे विवस्त्र फोटो आणि व्हिडीओ देखील काढले. हे अश्लील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन आरोपीने तिला वारंवार शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले.

(नक्की वाचा : Navi Mumbai News: पहिले कुरवाळलं, नंतर उचललं, मांजराच्या पिल्लाला पिशवीत कोंबलं, जोडप्याने पुढे जे केलं ते...)

नकार दिल्यावर मारहाण आणि धमकी

जेव्हा पीडित महिलेने आरोपीशी संबंध ठेवण्यास नकार दिला तेव्हा आरोपीने संतप्त होऊन तिला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच तिला राहते घर खाली करण्याची धमकी देखील दिली. या सततच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडितेने पोलिसांत धाव घेतली. या संतापजनक प्रकरणी 18 जून 2026 रोजी रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील जुईकर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. पोलिसांकडून सध्या घटनास्थळाचा पंचनामा आणि इतर पुराव्यांची पडताळणी सुरू असून फरार आरोपीचा कसून शोध घेतला जात आहे.

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com