Crime News: अश्लील फोटो, व्हिडिओ.. ब्लॅकमेलिंग अन् फसवणूक, मुंबईतील व्यक्तीचे तब्बल 'इतके' लाख लुटले

त्याच्या मोबाईलमध्ये असलेले फिर्यादीचे नग्न फोटो आणि व्हिडिओ दाखवून, ते त्याच्या पत्नी, नातेवाईक, मित्र आणि ग्राहकांना पाठवण्याची धमकी दिली.

जाहिरात
Read Time: 2 mins

Navi Mumbai Cyber Fraud Case:  खारघर तसेच कोलकत्ता येथे वास्तव्यास असलेल्या एका व्यक्तीकडून कोलकत्त्यातील एका महिलेनं तब्बल ₹२४ लाख १७ हजार २८ रुपये इतकी खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली असून पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.

फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, ती कलकत्ता व खारघर येथे असताना सुष्मिता सुकुमार देबनाथ (रा. ५८, बोसपुकुर, पुरबपारा, कसबा, कोलकत्ता, पश्चिम बंगाल – ७०००४२) या महिलेने त्याच्या मोबाईलमध्ये असलेले फिर्यादीचे नग्न फोटो आणि व्हिडिओ दाखवून, ते त्याच्या पत्नी, नातेवाईक, मित्र आणि ग्राहकांना पाठवण्याची धमकी दिली.

Mumbai News: सायबर फसवणुकीचा विचित्र प्रकार; 'i' ऐवजी '1' वापरून कंपनीला 30 लाखांचा गंडा

इतकेच नव्हे तर, तिने अश्लील भाषेत शिवीगाळ करून, फिर्यादी आणि त्यांच्या कुटुंबीयांना “शरीराचे १००० तुकडे करून मारून टाकण्याची” अशी थरकाप उडवणारी धमकी दिली. या सततच्या धमक्यांमुळे भीतीने फिर्यादीकडून सुष्मिता हिने रोख आणि ऑनलाईन स्वरूपात १८,१५,१३४ रुपये, तसेच ६,०१,८९४ रुपयांच्या महागड्या वस्तू अशा मिळून एकूण  २४,१७,०२८ रुपये उकळले.

या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या फिर्यादीने आता सुष्मिता सुकुमार देबनाथ हिच्याविरोधात कायदेशीर तक्रार दाखल केली असून, या प्रकरणाचा अधिक तपास नवी मुंबई पोलिसांकडून सुरू आहे. प्राथमिक चौकशीत हे प्रकरण सायबर ब्लॅकमेलिंग आणि खंडणीखोरीशी संबंधित असल्याचे दिसून आले आहे. आरोपी महिलेने सोशल मीडियाच्या माध्यमातून फिर्यादीशी संपर्क साधला होता, आणि त्यानंतर विश्वास संपादन करून अशा प्रकारे आर्थिक उकळपट्टी केली.

Advertisement

Viral Video: रस्त्यात अडवून वाघोबाला पाजली दारु? आता वन विभाग देणार दणका; व्हिडिओमागचे सत्य काय?

दरम्यान, नवी मुंबई पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा प्रकारच्या धमक्या किंवा ब्लॅकमेलिंगच्या घटनेत तत्काळ सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल करावी, आणि कोणत्याही परिस्थितीत अशा व्यक्तींना पैसे पाठवू नयेत.