जाहिरात

Viral Video: रस्त्यात अडवून वाघोबाला पाजली दारु? आता वन विभाग देणार दणका; व्हिडिओमागचे सत्य काय?

Chandrapur Viral Video Fact Check: रस्त्यात वाघाला अडवून त्याला दारु पाजल्याचा हा व्हिडिओ चंद्रपुर जिल्ह्यातील असल्याचाही दावा होत आहे. अशातच आता या व्हायरल व्हिडिओचे धक्कादायक सत्य समोर आले आहे. 

Viral Video: रस्त्यात अडवून वाघोबाला पाजली दारु? आता वन विभाग देणार दणका; व्हिडिओमागचे सत्य काय?

 Viral Video Fact Check:  सध्या पुणे जिल्ह्यासह विविध भागात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. अशातच सोशल मीडियावर एका व्हायरल व्हिडिओने खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एका व्यक्तीने चक्क वाघाला दारु पाजल्याचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. रस्त्यात वाघाला अडवून त्याला दारु पाजल्याचा हा व्हिडिओ चंद्रपुर जिल्ह्यातील असल्याचाही दावा होत आहे. अशातच आता या व्हायरल व्हिडिओचे धक्कादायक सत्य समोर आले आहे. 

सध्या एका व्हायरल व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. एका मद्य प्रेमीला वाटेत एक वाघ दिसतो,  दोघांची  भेट होते.. व्हिडिओमध्ये दाखवले आहे की तो व्यक्ती वाघाला घेतो, त्याला प्रेमाने साद घातली. आपुलकी दाखवत चक्क वाघाच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्याला दारुही पाजली. ही क्लिप समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल होत आहे. या क्लिप सोबत मजकूर टाकून ही घटना चंद्रपूर जिल्ह्यात घडली, असे समाज माध्यमांवर पसरविण्यात येत आहे.

Success Story: अपयश, नैराश्य अन् संघर्ष... वर्दीतल्या परीने करुन दाखवलं! हा VIDEO तुमचं आयुष्य बदलेल

 मात्र, खरे पाहता अशी घटनाच घडलेली नाही..ही क्लिप चक्क खोटी आहे..वन विभागाने चक्क एक प्रेस रिलीज काढून तसे स्पष्ट केले आहे. या क्लिप्समुळे महाराष्ट्राच्या वन विभागाला संताप आला आहे. महाराष्ट्राच्या वन विभागाने कायदेशीर कारवाईचे आदेश दिले आहेत.  या क्लिप्समुळे महाराष्ट्राचे वन्य जीव प्रेमी सुद्धा प्रचंड रागावले आहेत. वाघ आणि माणसाच्या AI generated क्लिप्स बनवून त्यांना सोशल मीडियावर खऱ्या असल्याचे भासवत पोस्ट करणाऱ्यांवर आता पोलिस कारवाई होणार आहे. अशा क्लिप्स तयार करण्याची गंमत आता त्यांच्या अंगलट येणार आहे.

त्याचबरोबर एक वृद्ध सुरक्षा रक्षक दाखवला आहे, ज्याला अचानक आलेल्या वाघाच्या हल्ल्याचा शिकार व्हावे लागते..वाघ त्याला फरफटत घेऊन जातो. ही घटना ब्रम्हपुरी येथील वन विभागाच्या डेपो जवळची असल्याचा दावा करण्यात आला आहे. ही क्लिप खरी वाटावी म्हणून त्यात सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसते त्यासारखी एक तारीख आणि वेळ सुद्धा टाकण्यात आलेली आहे. मात्र, ब्रहपुरीत काय अख्ख्या महाराष्ट्रात अशी घटनाच घडलेली नाही. 

दरम्यान, गेल्या काहीच आठवड्यांत या दोन क्लिप्स प्रचंड व्हायरल झाल्या आहेत. दोन्ही क्लिप्स कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच ए आय निर्मित असल्या तरी त्या चंद्रपूर जिल्ह्यात घडल्या असे दर्शवून खऱ्या असल्याचे भासवण्याचा प्रयत्न झाला आहे. कोण आहेत हे क्लिप्स बनवणारे आणि अशा क्लिप्स तयार करण्यामागे त्यांचा नेमका हेतू काय हे आता पोलिसांना शोधावे लागणार आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com