जाहिरात

नवाब मलिक यांच्या जावयाचा भीषण अपघात; डोक्याला गंभीर दुखापत, ICU मध्ये उपचार सुरू

अपघातात नवाब मलिक यांचा जावई समीर खान यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. 

नवाब मलिक यांच्या जावयाचा भीषण अपघात; डोक्याला गंभीर दुखापत, ICU मध्ये उपचार सुरू
मुंबई:

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या जावयाचा  भीषण अपघात झाला आहे. या अपघातात नवाब मलिक यांचा जावई समीर खान यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातावेळी समीर खान यांच्या पत्नी निलोफर त्यांच्यासोबत होत्या. ते दोघेही नियमित वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात गेले होते. चेकअप झाल्यानंतर ते रुग्णालयातून बाहेर आले. त्यांनी चालकाला गाडी आणायला सांगितलं. तेव्हा चालकाने गाडी आणताना चुकून ब्रेक ऐवजी एक्सलेटर दाबला. यामुळे गाडी जोरात येऊन समीर खान यांना धडकली. यामध्ये समीर खान यांना मल्टिफॅक्टर झालं आहे.

Latest and Breaking News on NDTV

त्यांच्यावर तातडीने रुग्णालयात उपचार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सध्या त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com