Beed Crime : संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड याच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे. वाल्मिक कराडच्या कार्यकर्त्यांनी संतोष देशमुख यांची अत्यंत निघृणपणे हत्या केली. त्याचे फोटो प्रसारमाध्यमांतून प्रसिद्ध झाल्यानंतर अख्खा महाराष्ट्र स्तब्ध झाला. त्यानंतर सुरेश धसांचा कार्यकर्ता सतिश भोसले याचाही मारहाण करीत असतानाचा व्हिडिओ समोर आला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
दरम्यान बीडचा बिहार होत असल्याची टीका विरोधकांसह सर्वसामान्यांपासून केली जात आहे. बीडमधील खंडणीसंदर्भातील गुन्हे आणि मारहाणीच्या घटना वारंवार समोर येत आहेत. विशेष म्हणजे येथील लोकप्रतिनिधींकडून या गुन्हेदारीकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचाही आरोप केला जात असताना बीडमधून आणखी एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.
नक्की वाचा - Santosh Deshmukh case: संतोष देशमुखांची हत्या कशामुळे झाली? डॉक्टरांचा अहवाल काय सांगतो?
आतापर्यंत धनंजय देशमुखांकडे राजीनाम्याची मागणी करणारे आणि बीडमधील गुन्हेगारीवर सवाल उपस्थित करणारे शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्याकडून शोरूमच्या मॅनेजरला मारहाण होत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. मारहाण करीत असणाऱ्यांमध्ये आमदार संदीप क्षीरसागर यांच्या पीएचादेखील समावेश आहे. बीडमधील या घटनेचा सीसीटीव्ही व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर बीडमधील गुंडगिरी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
दरम्यान या प्रकरणात संदीप क्षीरसागर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, तो व्हिडिओ जुना आहे. माझे कार्यकर्ते मारहाण करीत होते की, मारहाण होत असलेल्या व्यक्तीला वाचवित होते हे एकदा तपासून पाहायला हवं.