जाहिरात

दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनाचा 125 KM पर्यंत पाठलाग, ओव्हरटेक करताना झाला घात अन्...

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वाहन अपघातात एकाचा मृत्यू झाला असून तीन कर्मचारी जखमी झाले आहेत.

दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनाचा 125 KM पर्यंत पाठलाग, ओव्हरटेक करताना झाला घात अन्...
नाशिक:

दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनाचा पाठलाग करतांना नाशिकच्या चांदवड - मनमाड रोडवरील हरणूल शिवारात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वाहन अपघातात एक जागीच ठार झाला तर तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. पुण्यातून वारंवार हिट अँड रनची प्रकरणं समोर येत असताना आता नाशिकमधूनही असंच प्रकरण समोर आलं आहे. 

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे नाशिक येथील पथक सिल्व्हासा येथून नवसारीपर्यंत अवैध दारूसाठ्याची वाहतूक करणाऱ्या वाहनाचा (ट्रक) पाठलाग करीत होती. दरम्यान त्यांच्या वाहनाचा अपघात झाला. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यांनी लासलगाव येथील पोलिसांना सोबत घेत चांदवड - मनमाड रोडवरून अवैध दारूसाठ्याची वाहतूक करणाऱ्या वाहनाचा पाठलाग सुरू केला. हरणूल शिवारात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वाहनाने अवैध दारू वाहतूक करणाऱ्या वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी त्या वाहनाने धडक दिल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाचे वाहन रस्त्याच्या कडेला शेतात पलटले. या अपघातात चालक कैलास कसबे जागीच ठार झाला तर तीन कर्मचारी जखमी झाले.

नक्की वाचा - मृत्यू समोर दिसत असताना तो तंबाखू मळत होता; पुरात अडकलेल्या व्यक्तीचा VIDEO व्हायरल

अपघातानंतर पळून गेलेल्या वाहनाला पकडण्यासाठी नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलीस प्रशासनाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. अपघातातील मृत चालकाच्या मृतदेहावर मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून  नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. दरम्यान पळून गेलेल्या वाहनांचा पोलीस शोध घेत आहे. विशेष म्हणजे या पथकाने घोटी ते नाशिक, नाशिक ते मनमाड, मनमाड ते चांदवड असे सव्वाशे किलोमीटरपर्यंत सिनेस्टाईल पद्धतीने ट्रकचा पाठलाग केला होता. अवैध मद्य वाहतूक करणाऱ्या ट्रकने पथकाच्या दोन कार उडवल्या. यातील एक सरकारी आणि दुसरी खाजगी कार आहे. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com