
जम्मू काश्मीरच्या पहलगामध्ये दहशतवादी हल्ला झाला. हा हल्ला तीन दहशतवाद्यांनी केला. यांची ओळख पटली आहे. जम्मू काश्मीर पोलिसांनी हे तिघे ही लष्कर ए तोयबा या अतिरेकी संघटनेचे सदस्य असल्याचे सांगितले आहे. शिवाय यामध्ये दोघे जण हे पाकिस्तानचे नागरिक आहेत. यात हासिम मूसा उर्फ सुलेमान, अली भाई उर्फ तल्हा भाई आणि आदिल हुसैन ठोकर अशी त्यांची नावे आहेत. या तिघांवरही 20-20 लाखांचे बक्षिस ठेवण्यात आले आहे. जो कोणी यांची माहिती देईल त्यांना हे बक्षिस देण्यात येणार आहे. 22 एप्रिलला या अतिरेक्यांनी पर्यटकांवर हल्ला केला होता. त्यात 26 जणांचा जीव गेला होता.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर राजकीय दबाव वाढवला आहे. सिंधु पाणी वाटप करार स्थगित करण्यात आला. पाकिस्तानी नागरिकांना भारतीय व्हिसा देण्यात येणार नाही. जे पाकिस्तानी नागरिक भारतात आहेत त्यांना भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पाकिस्तानी दुतावासातील अधिकाऱ्यांनाही भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भारतातील पाकिस्तानी उच्चायोग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याच बरोबर अटारी वाघा बॉर्डर ही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 1 मे पर्यंत ही बॉर्डर बंद राहील.
या हल्ल्यानंतर देशभर संतापाचं वातावरण आहे. हल्लेखोरांना चोख उत्तर दिलं जाईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल अशी शिक्षा हल्लेखोरांना दिली जाईल असं ही त्यांनी सांगितले. पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांना आणि त्यांच्या सूत्रधारांना पंतप्रधान मोदींनी मोठा इशारा दिला आहे. भारताच्या आत्म्यावर हल्ला करण्याचे धाडस करणाऱ्यांना सोडले जाणार नाही. दहशतवादाचा कणा मोडल्याशिवाय आपण थांबणार नाही. दहशतवाद्यांच्या आकांनाही सोडले जाणार नाही, असंही पंतप्रधान मोदींनी म्हटलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की, "जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी निष्पाप नागरिकांना ज्या क्रूरतेने मारले त्याबद्दल संपूर्ण देश दुःखी आहे. कोट्यवधी देशवासीय दुःखी आहेत. संपूर्ण राष्ट्र पीडित कुटुंबांच्या दुःखात सहभागी आहे. सध्या उपचार घेत असलेल्या कुटुंबातील सदस्यांना लवकर बरे व्हावे यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. या दहशतवादी हल्ल्यात कुणीतरी आपला मुलगा गमावला, कोणीतरी आपला भाऊ गमावला, कोणीतरी आपला जोडीदार गमावला." असं म्हणत त्यांनी दुख: व्यक्त केलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world