जाहिरात

PM Modi : "हल्लेखोरांनी कल्पनाही केली नसेल अशी शिक्षा देणार', पंतप्रधान मोदींचा कडक इशारा

PM narendra Modi Pahalgam Attack : हल्लेखोरांना चोख उत्तर दिलं जाईल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.  त्यांना कल्पनाही केली नसेल अशी शिक्षा हल्लेखोरांना केली जाईल, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे.  

PM Modi : "हल्लेखोरांनी कल्पनाही केली नसेल अशी शिक्षा देणार', पंतप्रधान मोदींचा कडक इशारा

PM Modi News : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याबाबत देशभर संतापाचं वातावरण आहे. हल्लेखोरांना चोख उत्तर दिलं जाईल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.  त्यांना कल्पनाही केली नसेल अशी शिक्षा हल्लेखोरांना केली जाईल. पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांना आणि त्यांच्या सूत्रधारांना पंतप्रधान मोदींनी मोठा इशारा दिला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

भारताच्या आत्म्यावर हल्ला करण्याचे धाडस करणाऱ्यांना सोडले जाणार नाही. दहशतवादाचा कणा मोडल्याशिवाय आपण थांबणार नाही. हल्यामागील दहशतवाद्यांच्या आकांनाही सोडले जाणार नाही, असंही पंतप्रधान मोदींनी म्हटलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की, "जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी निष्पाप नागरिकांना ज्या क्रूरतेने मारले त्याबद्दल संपूर्ण देश दुःखी आहे. कोट्यवधी देशवासीय दुःखी आहेत. संपूर्ण राष्ट्र पीडित कुटुंबांच्या दुःखात सहभागी आहे. सध्या उपचार घेत असलेल्या कुटुंबातील सदस्यांना लवकर बरे व्हावे यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. या दहशतवादी हल्ल्यात कुणीतरी आपला मुलगा गमावला, कोणीतरी आपला भाऊ गमावला, कोणीतरी आपला जोडीदार गमावला."

(नक्की वाचा - Pahalgam Terror Attack : आम्ही टिकल्या काढल्या अन् 'अल्लाह हू अकबर' म्हणायला लागलो, गणबोटेंच्या पत्नीने सांगितला धक्कादायक अनुभव)

"ज्यांच्यावर हल्ला झाला त्यापैकी काही बंगाली बोलत होते, काही कन्नड बोलत होते, काही मराठी बोलत होते, काही उडिया बोलत होते आणि काही बिहारचे होते. कारगिलपासून कन्याकुमारीपर्यंत, त्या सर्व लोकांच्या मृत्यूबद्दलचे आपले दुःख सारखेच आहे. आपला राग सारखाच आहे. देशाच्या शत्रूंनी भारताच्या आत्म्यावर हल्ला करण्याचे धाडस केले आहे."

(नक्की वाचा- Pahalgam Terror Attack : पाकिस्तान पाण्यासाठी तडफडणार; भारताचे 5 निर्णय पाकिस्तानला गुडघे टेकायला लावणार)

"मी अगदी स्पष्ट शब्दात सांगतो, ज्या दहशतवाद्यांनी हा हल्ला केला आणि ज्यांनी या हल्ल्याचा कट रचला त्यांना त्यांच्या कल्पनेपेक्षा मोठी शिक्षा मिळेल. आता दहशतवाद्यांचे उरलेले अड्डे नष्ट करण्याची वेळ आली आहे", असा थेट इशाराही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला आहे.

VIDEO : पंतप्रधान नरेंद्र मोदींचं संपूर्ण भाषण

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: