मनोज सातवी
शिक्षिकेने कानाखाली मारली. ती इतकी जबरदस्त होती की ती तिच्या जिवावर बेतली असती. पण तिचं दैव बलवत्तर म्हणून ती वाचली. पण ते 22 दिवस तिचे संघर्षाचे होते. शेवटी ती जिंकल मृत्यूलाही तिनं मात दिली. ही घटना घडली आहे नालासोपाऱ्यामध्ये. इथे एका 10 वर्षाच्या मुलीला तिच्या शिक्षिकेने कानाखाली मारली. तो फटका इतका जबर होती की तिच्या कानातल्यांचा आघात तिच्या मेंदू आणि श्वसननलीकेवर झाला. तिला थेट आयसीयूमध्ये दाखल करावं लागलं. ती व्हेंटीलेटरवर होती. या काळात गरीब आईवडीलांकडे काही नव्हते. त्यांना कर्जबाजारी व्हावं लागले. पण त्यांनी आपल्या लेकीला वाचवलं.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
दीपिका अंबाराम पटेल. ही दहा वर्षाची विद्यार्थिनी नालासोपाऱ्याला शिक्षण घेतेल. ती क्लासमध्ये असताना तिच्या शिक्षिकेने तिच्या कानाखाली मारली. प्राथमिक उपचार करण्यात आले. शिक्षिकेनेही तिची चुक कबूल केली. शिवाय तिला औषधही घेवून दिली. पण दीपिकाची तब्बेत अचानक बिघडली. तिला मुंबईला हलवण्यात आलं. आधी वाडीया आणि नंतर सोमय्या हॉस्पिटलमध्ये तिला दाखल करण्यात आले.
ट्रेंडिंग बातमी - फडणवीस- पवारांचं ठरलं, एकनाथ शिंदेंचे मात्र तळ्यात-मळ्यात
ज्यावेळी तिचे चेकअप करण्यात आले त्यावेळी तिच्या मेंदूला आणि श्वसननलीकेला गंभीर दुखापत झाल्याचे उघड झाले. तिची तब्बेत ढासळत होते. अशी वेळी तातडीने तिला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील 22 दिवस ती आयसीयूमध्ये होती. तिला व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आलं होतं. तिचा मृत्यूशी लढा सुरू होता. तर मुलीला कसं वाचवायचं. त्यासाठी लागणारे पैसे कसे जमवायचे यासाठी तिच्या आई वडिलांचा संघर्ष सुरू होता. शेवटी त्यांनी कर्जबाजारी होती सात ते आठ लाख रूपये जमा केले.
डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आलं. 22 दिवसानंतर दीपिकाने डोळे उघडले. ती थोडथोडं खावू लागली. त्यानंतर डॉक्टरांनी तिला घरी जाण्याची परवानगी दिली. ती सुखरूप घरी आल्याने तिच्या आई वडीलांनी आनंद व्यक्त केला. पण गेल्या दिड महिन्यात त्यांनी जे भोगलं, त्याची आठवण जरी त्यांनी काढली तरी त्यांच्या अंगावर काटा येतो. मुलगी काही खात नव्हती. तिची काही हालचाल होत नव्हती. तिला श्वास घेण्यात त्रास होत होता. अशी वेळी पालकांची अवस्था वाईट झाली होती.
ट्रेंडिंग बातमी - फडणवीस करणार आपल्या नावावर अनोखं रेकॉर्ड, जे भुजबळ,आबा, दादांना जमलं नाही ते...
आता दीपिका बरी झाली आहे. पण पूर्ण बरी झालेली नाही. तिला नियमित चेकअप करावं लागणार आहे. आत दीपिकाच्या पालकांना न्याय हवा आहे. ज्या शिक्षिकेने मारले तिच्या विरोधात कारवाई झाली पाहीजे अशी मागणी त्यांनी केली आहे. पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पण त्या विरोधात काही कारवाई केली जात नाही. आम्ही कारवाई करतो असं केवळ सांगितलं जात आहे. प्रत्यक्षात काही होत नाही असं तीचे पालक सांगत आहेत. मुलीसाठी आम्ही कर्जबाजारी झालो आता आमचे पुढे काय होणार असा प्रश्न त्यांना पडला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world