Palghar News: पालघर जिल्ह्यात 20 वर्षीय आदिवासी तरुणीला लग्नाचं आमिष देऊन तीन लाख रुपयांमध्ये तिची विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या महिलेची विक्री आणि छळ केल्याप्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पीडित महिला कातकरी समुदायातील असल्याची माहिती समोर आलीय.
पीडित महिलेचे गंभीर आरोप
वर्ष 2024मध्ये नाशिकमधील एका व्यक्तीसोबत जबरदस्तीने लग्न लावून देण्यात आल्याचा आरोप पीडित महिलेने केलाय. प्राथमिक तपासानुसार समोर आलेल्या माहितीच्या आधारे पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, मुलीची तस्करी करून तिचे लग्न लावून देणाऱ्या दोन लोकांना आरोपी आणि आरोपीच्या आईने कथित स्वरुपात तीन लाख रुपये दिले होते
गर्भावस्थेत मारहाण आणि जेवणही दिलं नाही
तक्रारदार महिलेने म्हटलंय की, पती तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करत होता तसंच वारंवार जातीवाचक शिवीगाळही करायचा. गरोदर असतानाही पतीने मारहाण केली होती. इतकंच नव्हे तर तिला वेळेवर जेवणही दिलं जात नव्हतं.
(नक्की वाचा: Pune News: 17 वर्षांच्या मुलाच्या हत्येनं पुण्यात खळबळ; आधी मुलीच्या मदतीने अपहरण, मग दगड-कोयत्याने केले वार)
धक्कादायक प्रकरण असे आले उघडकीसपोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, बाळाच्या जन्मानंतर महिला जून 2025 रोजी आपल्या आईच्या घरी परतली. 6 जानेवारी रोजी आरोपीने तिचे बाळ पळवून नेण्याचा प्रयत्न केला तेव्हा हे प्रकरण उघडकीस आले. प्रकरण हाताबाहेर गेल्याने पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.
पोलीस निरीक्षक दत्तात्रेय बाजीराव किंद्रे यांनी सांगितलं की, आरोपी, त्याची आई आणि दोन मध्यस्थांविरुद्ध वाडा पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता आणि अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय, पोलीस पुढील तपास करतायेत.
(Content Source PTI)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
