जाहिरात

Palghar News: सलवार खाली ओढली, हातावर वार, वकील महिले बरोबर धावत्या ट्रेनमध्ये भयंकर घडलं

ठाणे येथील रहिवाशी असलेल्या अॅड. शितल भोसले या मुलीला भेटण्यासाठी इंदूर येथे निघाल्या होत्या.

Palghar News: सलवार खाली ओढली, हातावर वार, वकील महिले बरोबर धावत्या ट्रेनमध्ये भयंकर घडलं
पालघर:

मनोज सातवी 

हातामधील रुद्राक्ष आणि  छत्रपती शिवाजी महाराजांचे हातावर नाव एका महिलेने कोरले होते. यावरून वाद झाला आहे. मुंबईहून इंदूरकडे जाणाऱ्या  धावत्या अवंतिका एक्स्प्रेसमध्ये एक महिला प्रवाशावर तीक्ष्ण वस्तूने वार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शितल शरद भोसले, वय 43 असे हल्ला झालेल्या महिलेचे नाव आहे. त्या ठाण्याच्या रहिवाशी असून  पेशाने वकील आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

याप्रकरणी रुबिना युनुस पठाण  आणि इम्तियाज अबिदभाई ओडीया या दोन आरोपींच्या विरोधात  पालघर रेल्वे पोलीस ठाणे येथे विनयभंग आणि मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाय त्यांना अटक करण्यात आली आहे. सदर घटनेची माहिती हिंदुत्ववादी संघटनांना मिळाल्यानंतर त्यांनी पालघर रेल्वे पोलीस ठाण्यात गर्दी केल्याने वातावरण तणावाचे निर्माण झाले होते.

ट्रेंडिंग बातमी - Ajit Pawar:'अजित पवारांचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पूर्ण होईल, पण त्यांनी...' थेट ऑफर कुणी दिली?

ठाणे येथील रहिवाशी असलेल्या अॅड. शितल भोसले या मुलीला भेटण्यासाठी इंदूर येथे निघाल्या होत्या. शनिवारी रात्री अवंतिका एक्स्प्रेसच्या जनरल कोचमधून त्या प्रवास करत होता. जनरल डब्यात अल्पसंख्याक समाजाचे प्रवासी जास्त होते. यावेळी पीडित महिलेच्या हातामध्ये रुद्राक्षाची माळ होती. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव कोरले होते. त्यावरून ही ती महिला भोसले यांना विचारणा करत होती. 

ट्रेंडिंग बातमी - Ishan Kishan: क्रिकेटर इशान किशन करणार 'या' पक्षाचा प्रचार, वडिलांनी दिली मोठी बातमी

प्रवासादरम्यान एका अल्पसंख्यांक महिलेने शितल भोसलेंना हटकले आणि त्यांच्याशी हुज्जत घालायला सुरूवात केली. त्यानंतर आरोपी महिला आणि तिच्या नातेवाईकाने शितल भोसले यांच्या भोवती कडे केले. त्यानंतर मारहाण करून विनयभंग केल्याचा आरोप शितल भोसले यांनी केला आहे. आपली सलवार खाली खेचली गेली. ब्लेडने हातावर वार केला गेला असा आरोप ही त्यांनी केला आहे.  या प्रकरणी पालघर  लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: