जाहिरात

Panchkula Death Mystery: काचेवर टॉवेल, गाडीत 7 मृतदेह.. जीव सोडण्याआधी हादरवणारं कारण सांगितलं!

Panchkula Car Death Mystery Inside Story: आम्ही हॉटेल शोधले मात्र मिळाले नाही त्यामुळे कारमध्येच झोपलो. यावेळी पोलिसांना घटनास्थळी एक चिठ्ठीही सापडली आहे त्यामुळे या कुटुंबाने आत्महत्या केल्याचे दिसत आहे. 

Panchkula Death Mystery: काचेवर टॉवेल, गाडीत 7 मृतदेह.. जीव सोडण्याआधी हादरवणारं कारण सांगितलं!

हरियाणा: मंगळवारी (ता. 27, मे) सकाळी हरियाणातील पंचकुला येथे एका कारमध्ये सात जणांचे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. एकाच घरातील सात जणांनी सामूहिक आत्महत्या केल्याच्या भयंकर घटनेने परिसर हादरून गेला आहे. एखाद्या सिनेमातील सीन वाटावा अशा या मन सुन्न करणाऱ्या आत्महत्येची आता इनसाईड स्टोरी समोर आली असून प्रत्यक्षदर्शीने घटनास्थळी नेमकं काय घडलं? याबाबत मोठा खुलासा केला आहे. 

नक्की वाचा - Maharashtra Rain : सोलापुरकरांसाठी चांगली बातमी! जून उजाडण्यापूर्वीच उजनी धरण होणार फुल्ल

दरवाजे बंद केलेली कार, काचांवर पांढरा टॉवेल अन् आतमध्ये निपचित पडलेले सात मृतदेह. मंगळवारी सकाळी पंचकुलाच्या सेक्टर 27 मध्ये एका घराबाहेर उभ्या असलेल्या कारमधील हे दृश्य पाहून सगळेच हादरुन गेले. कारमधील सर्व सात जणांचा मृत्यू झाला होता. . घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि फॉरेन्सिक पथके घटनास्थळी पोहोचली.पंचकुला डीसीपी हिमाद्री कौशिक यांच्या मते ही आत्महत्या वाटत असली तरी घटनास्थळी मिळालेले पुरावे काही वेगळेच इशारे करत आहेत. 

ज्या कारमध्ये मृतदेह आढळले ती कार उत्तराखंडमधील डेहराडून येथील रहिवासी प्रवीण मित्तल यांची होती. ते त्याच्या कुटुंबासह पंचकुला येथे हनुमान कथा ऐकण्यासाठी आले होते असे सांगण्यात येत आहे. कथा संपल्यानंतर कुटुंब डेहराडूनला परतणार होते मात्र त्याआधीच ही भयंकर घटना घडली.  गाडीत प्रवीण मित्तल, त्यांचे वडील देशराज मित्तल, आई, पत्नी आणि तीन मुले होती. 

नक्की वाचा - Explainer : अमेरिकेतील सर्वात जुनं विद्यापीठ अन् सर्वोच्च घटनात्मक पदामध्ये संघर्ष, विद्यार्थ्यांची चिंता वाढली

प्रत्यक्षदर्शीने सांगितलेल्या माहितीनुसार, आत्महत्येच्या आधी  कोणीही आत डोकावू नये म्हणून गाडीच्या खिडक्यांना पांढरे टॉवेल लटकवले होते. पण शेजारी फिरणाऱ्या पुनीत राणा नावाच्या एका तरुणाला काहीतरी विचित्र वाटले. जेव्हा त्याने खिडकीतून पाहिले तेव्हा त्याला गाडीत लोक बेशुद्ध पडलेले दिसले, काहींनी उलट्या केल्या होत्या आणि प्रवीण मित्तल जिवंत होते.

यावेळी एकाने त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता प्रविण मित्तल यांनी सांगितले की, मी कर्जात बुडालो आहे आणि पाच मिनिटांत मरणार आहे. आमचे नातेवाईक खूप श्रीमंत आहेत मात्र कोणीही मदत केली नाही. आम्ही हॉटेल शोधले मात्र मिळाले नाही त्यामुळे कारमध्येच झोपलो. यावेळी पोलिसांना घटनास्थळी एक चिठ्ठीही सापडली आहे त्यामुळे या कुटुंबाने आत्महत्या केल्याचे दिसत आहे. 

दरम्यान, फॉरेन्सिक टीमने कारमधून नमुने आणि पुरावे गोळा केले आहेत. गाडीतील वास, उलट्या आणि ड्रग्जचे अवशेष हे सर्व आत्महत्येकडे निर्देश करत होते. परंतु मृत्यूचे खरे कारण तपास पूर्ण झाल्यानंतर आणि शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच उघड होईल. मित्तल कुटुंब बऱ्याच काळापासून आर्थिक संकट आणि कर्जामुळे त्रस्त होते. ही आत्महत्या सामूहिक निर्णयाचा भाग होती. कर्जामुळेच या कुटुंबाने एकत्रितपणे आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com