
सोलापूर पुणे आणि नगर जिल्ह्यासाठी एक आनंदाची बातमी पुढे येत आहे. उजनी धरण आता प्लस मध्ये आले आहे. 122 टीएमसी चे असणारे उजनी धरण गेल्या आठवड्याभरातील पावसामुळे वधारून प्लस मध्ये आले आहे. सोमवारी दिवसभरात उजनी धरण तब्बल सात टक्क्यांनी वधारले गेले. काल सकाळी वजा सात टक्के असणारे उजनी धरण आता प्लस मध्ये येऊन पोहोचले आहे. हा विक्रम मानला जात आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
त्यामुळे उजनी धरणाचा साठा जवळपास 64 टीएमसी इतका प्लसमध्ये आल्याचं दिसून येत आहे. वास्तवामध्ये उजनी धरण ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात पुणे जिल्ह्यातील पावसामुळे प्लस मध्ये येते. मात्र यंदा प्रथमच मे महिन्यातच उजनी धरण हे वजा क्षमतेतून अधिक क्षमतेमध्ये आलेले आहे.
नक्की वाचा - Maharashtra Rain : आजही राज्यात मुसळधार? 'या' जिल्ह्यांना हवामान विभागाकडून रेड अलर्ट
उजनी धरणाची पाणी पातळी आता 28 टीएमसीवर पोहोचली आहे. काही दिवसांपूर्वी, 22 मे रोजी धरणात 19.69 टीएमसी पाणीसाठा होता. त्यानंतर केवळ चार दिवसांत, म्हणजेच रविवारी धरणाची पाणी पातळी वाढून 25.69 टीएमसी झाली. विशेष म्हणजे, रविवारी एकाच दिवसात 3 टीएमसी पाण्याची वाढ झाली.
उजनी धरणाची पाणी पातळी 290.420 दशलक्ष घनमीटर (एमसीएम) इतकी नोंदली गेली, जी 54.62 टीएमसी इतकी आहे. यापैकी उपयुक्त पाणीसाठा 4.93 टीएमसी आहे. धरणातील एकूण पाणीसाठ्याची टक्केवारी 57.62 टक्क्यांवर पोहोचली आहे. सध्या धरणात 18 हजार 406 क्युसेक इतका पाण्याची आवक सुरू आहे, त्यामुळे येत्या दोन-तीन दिवसांत धरण पूर्ण क्षमतेने भरेल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world