संकेत कुलकर्णी, प्रतिनिधी
Pandharpur News : पंढरपूरच्या रांजनी गावात भीषण अपघात घडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पंढरपूरच्या म्हसवड पंढरपूर मार्गावर तांदूळवाडी गावाजवळ पिकअप गाडी विहिरीत पडून मोठा अपघात झाला आहे. या अपघातात ८ ते ९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. हा ग्रुप पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावतील असल्याची माहिती आहे.
म्हसवड येथील सिद्धनाथाच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या पिकअप वाहनाला हा अपघात घडला. गावाकडे परत येत असताना माळशिरस तालुक्यातील तांदळवाडी गावानजीक एका विहिरीत पिकअप गाडी पडून हा मोठा अपघात घडला.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, तांदुळवाडी अपघातात ७ जणांना वाचवण्यात यश आलं आहे. जेसीबी व इतर यंत्रणाच्या सहाय्याने पोलिसांना सात जणांना वाचवलं आहे. या रोडवर अशा दोन ते तीन धोकादायक विहिरी असल्याची माहिती एका स्थानिकाने दिली. ही विहीर हायवेपासून १० फूट अंतरावर आहे अशी माहिती स्थानिक ग्रामस्थ सरजू चव्हाण यांनी दिली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world