जाहिरात

Crime News: पनवेलमध्ये शरिर विक्रीचा व्यवसाय, पोलिसांनी छापा टाकला अन्...

या प्रकरणी राजु विनोद दास, अरूणकांत राजनारायण चतुर्वेदी यांना अटक करण्यात आली आहे.

Crime News: पनवेलमध्ये शरिर विक्रीचा व्यवसाय, पोलिसांनी छापा टाकला अन्...
पनवेल:

राहुल कांबळे

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या निर्देशानुसार अनैतिक व्यापार व अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेंतर्गत पनवेल येथील प्रशांत लॉजिंग, विसराळी नाका, नवी मुंबई मर्कन्टाईल बँकेसमोर, एमसीसीएच सोसायटी, मुंबई–पुणे रोड या ठिकाणी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने छापा टाकला. छापा टाकल्यानंतर पोलिसांनी तिथून पाच पीडित महिलांची सुटका केली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

या कारवाईतून वेश्याव्यवसायात गुंतलेल्या 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर दोन आरोपी फरार आहेत.
वरिष्ट पोलिस निरिक्षक   पृथ्वीराज घोरपडे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत याबाबतची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिस बनावट ग्राहक बनले. त्यातून त्यांनी शरिर विक्री करणाऱ्यां विरोधात सापळा रचला. 30  मे रात्री साडे दहा वाजता छापा टाकला. त्यावेळी लॉजमध्ये वेश्याव्यवसायासाठी ठेवलेल्या पाच महिला आढळून आल्या. 

ट्रेंडिंग बातमी - Dhule News : जमिनीवर आपटलं नंतर जमिनीत पुरलं; आईसमोरच दीड वर्षांच्या चिमुकल्याला सावत्र बापाने संपवलं

या प्रकरणी  राजु विनोद दास,  अरूणकांत राजनारायण चतुर्वेदी यांना अटक करण्यात आली आहे. तर मयुर डावरे  आणि अरूण शेट्टी हे फरार आहेत. यातला मयुर डावरे हा महिलांचा पुरवठा करणारा होता. तर अरूण शेट्टी हा लॉज चालक आहे. पोलिस तपासात उघड झाले की, आरोपी मयुर डावरे यांच्याकडून महिलांना लॉजमध्ये आणून ठेवले जात होते. वेटर अरुणकांत चतुर्वेदी यांनी बनावट ग्राहकास महिलांची निवड करू दिली. त्यानंतर निवडलेल्या महिलेला वेश्याव्यवसायासाठी पाठवले. त्याबदल्यात 5500 रुपये घेतले होते. 

ट्रेंडिंग बातमी - Nitesh Rane: मुंबईत वॉटर टॅक्सी सुरू होण्याच्या हालचालींना वेग, 'इतक्या' मिनिटात गाठता येणार नवी मुंबई

या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पनवेल शहर पोलीस करत आहेत. मात्र पनवेल शहरात असे व्यवसाय होत असल्याने स्थानिकांना धक्का बसला आहे. अशा व्यवसायांना वेळीच पायबंद घालण्याची मागणी ही स्थानिकांनी केली आहे. गेल्या काही दिवसापासून पोलिसांनी याबाबत धडक मोहिम राबवली आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com