
नागिंद मोरे, धुळे
Dhule News : सावत्र बापाने दारूच्या नशेत दीड वर्षाच्या चिमुकल्याचा जीव घेतल्याची घटना धुळे तालुक्यातील रामी गावात घडली आहे. पंकज बागुल असं नराधम सावत्र बापाचं नाव आहे. तर कार्तिक असं मृत चिमकल्याचं नाव आहे. आईसमोर ही घटना घडल्याने सोनगीर पोलिसांना नवरा-बायको दोघांनाही या प्रकरणी बेड्या ठोकल्या आहेत.
(नक्की वाचा- 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मिळालेल्या माहितीनुसार, सावत्र बाप पंकज बागुल याने दारूच्या नशेत अवघ्या दीड वर्षांचा मुलगा कार्तिकचा जीव घेतला. रागाच्या भरात दीड वर्षांच्या कार्तिकला पंकजने जोरात जमिनीवर आपटलं. या कार्तिकचा जागेवरच जीव गेला. विशेष म्हणजे ही घटना आई सुरेखा बापू सोनवणेच्या डोळ्यादेखत घडली.
(नक्की वाचा - Naxalite : बसवराजूनंतर सुरक्षा दलाला आणखी एक यश; 10 लाखांचं बक्षीस असलेला एक बडा नक्षलवादी ठार)
पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, सुरेखा बापू सोनवणे या महिलेचा पती हा मध्यप्रदेशात असून त्याच्याशी जमत नसल्याने ती आपल्या दीड वर्षाचा कार्तिकसोबत रामी गावात राहत होती. लामकानी गावातील रहिवासी पंकज बापू बागुल याचे सुरेखाशी प्रेमसंबंध जुळले. त्यानंतर सुरेखा मुलगा कार्तिक आणि पंकज बागुल हे तिघे सागर गुलाब गिरासे यांचे शेतात कामानिमित्त गेल्या चार महिन्यापासून राहत होते.
नेमकं काय घडलं?
पंकज सुरुवातीपासूनच कार्तिगचा राग राग करत असे. कार्तिकला छोट्या-छोट्या कारणांवरून मारहाण करायचा. घटनेच्या दिवशी देखील कार्तिक रडायला लागल्याने नराधम पंकजने त्याला मारहाण करत जोरात जमिनीवर आपटलं. यात कार्तिकचा जागेवरच जीव गेला. त्यानंतर त्याने कार्तिकचा मृतदेह बाजूच्या शेतात पुरला. पंकजच्या या सर्व कृत्यात सुरेखाची देखील त्याला साथ होती.
(नक्की वाचा- Akola Crime: कृषी अधिकाऱ्यांची मोठी कारवाई! लाखो रुपयांचे बोगस बियाणे जप्त)
प्रकरण कसं आलं समोर?
कार्तिक दिवसभर घराभोवती खेळत असे. मात्र काही दिवसांपासून कार्तिक दिसला नाही म्हणून सागर गिरासे यांनी सुरेखा आणि पंकजकडे त्याची चौकशी केली. त्यावेळी तो गावी गेल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र गिरासे यांना संशय आल्याने त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी देखील तातडीने घटनास्थळी दाखल होत तपास सुरु केला. आजूबाजूच्या शेतात शोध घेतला त्यानंतर तब्बल 12 दिवसानंतर पोलिसांना लामकानी शिवारातील एका शेतात मृतदेह आढळला. याप्रकारणी सोनगीर पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात असून सावत्र बाप व आईला सोनगीर पोलिसांनी अटक केली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world