विष्णू बुरगे, प्रतिनिधी
latur Crime News Today : शिक्षणाचे केंद्र म्हणून ओळख असलेल्या लातूर शहरात शाळकरी मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.शहरातील पीव्हीआर चौक परिसरात मुलींची छेड काढल्याच्या संशयावरून एका तरुणाला संतप्त नागरिकांनी बेदम मारहाण करत त्याची धिंड काढल्याची घटना घडली.या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार,लातूर शहरातील विविध शाळा महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेसमध्ये शिक्षण घेण्यासाठी ग्रामीण भागासह शेजारील जिल्ह्यांतील हजारो विद्यार्थी-विद्यार्थिनी दररोज ये-जा करतात.विशेषतः मुलींची संख्या मोठी असल्याने त्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा नेहमीच महत्त्वाचा मानला जातो.अशातच गेल्या काही दिवसांपासून दोन तरुण काही शाळकरी मुलींचा पाठलाग करत असल्याची आणि त्यांना त्रास देत असल्याची चर्चा परिसरात सुरू होती.याबाबत नागरिकांमध्येही भीतीचं वातावरण पसरलं होतं.
नक्की वाचा >> Baramati News बारामती हादरलं! पोलीस उपनिरीक्षकासह एकाने महिलेवर केला लैंगिक अत्याचार,पोलीस भरतीचं कनेक्शन समोर
संतप्त नागरिकांनी तरुणाला बेदल मारहाण केली अन्..
दरम्यान,आज संबंधित तरुण पुन्हा परिसरात दिसल्याची माहिती मिळताच काही नागरिकांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला.यावेळी दोघांपैकी एक जण तेथून पळून जाण्यात यशस्वी झाला,तर दुसरा नागरिकांच्या ताब्यात सापडला.त्यानंतर संतप्त नागरिकांनी त्याला बेदम मारहाण केली.एवढेच नव्हे तर त्याची धिंड काढत एमआयडीसी पोलीस ठाण्यापर्यंत नेण्यात आले.नंतर संबंधित तरुणाला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
नक्की वाचा >> Pune News: विठ्ठल नामाच्या गजरात पालख्या पुण्यात दाखल, आयुक्तांच्या एका कृतीनं सर्व वारकरी झाले खुश, Video
या घटनेबाबत कळताच मोठ्या संख्येने नागरिक घटनास्थळी जमा झाले होते.त्यामुळे काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.शिक्षणासाठी राज्यभरात प्रसिद्ध असलेल्या लातूर शहरात ग्रामीण भागातील तसेच इतर जिल्ह्यांतील अनेक मुली शिक्षणासाठी वास्तव्यास असतात.त्यामुळे विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेबाबत पालकांमध्येही चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू असून घटनेमागील नेमकी वस्तुस्थिती काय आहे,याचा तपास केला जात आहे.तसेच कायदा हातात घेण्याच्या प्रकारांबाबतही पोलिसांकडून आवश्यक प्रक्रिया राबविण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे.