जाहिरात

Mahakumbh 2025 : महाकुंभात महापाप! सांगलीतील तरुणाने महिलांचे स्नान करतानाचे फोटो, व्हिडीओ काढले अन्...

Mahakumbh 2025: पुढील कारवाईसाठी प्राज आणि प्रज्वल यांस अहमदाबाद येथे नेण्यात आले आहे .या घटनेला शिराळा पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम यांनी दुजोरा दिला आहे

Mahakumbh 2025 : महाकुंभात महापाप! सांगलीतील तरुणाने महिलांचे स्नान करतानाचे फोटो, व्हिडीओ काढले अन्...

राहुला कुलकर्णी, NDTV मराठी

कुंभमेळा प्रयगराज येथे त्रेवेणी संगम ठिकाणी स्नान आणि दर्शनासाठी देशविदेशातील भक्त प्रयगराज येते आहेत. याच ठिकाणी काही विकृत लोकांकडून महिलांचे आक्षेपार्ह व्हिडीओ फोटो रेकॉर्डिंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. यात प्रयगराज आणि महाराष्ट्रातील काही संशयीत लोकांवर सायबर क्राईम अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

यातील सांगली जिल्ह्यातील शिराळा येथील प्राज राजेंद्र पाटील आणि जत येतील प्रज्वल तेली या युवकांना लातूर येथून ताब्यात घेण्यात आलं  आहे. या युवकास अहमदबाद येथील सायबर पथकाने शिराळा पोलिसांच्या मदतीने अटक केली आहे.

(नक्की वाचा- Vasai Crime: पालिका अधिकाऱ्यांची बदनामी अन् ब्लॅकमेलिंग; सराईत गुन्हेगार अखेर अटकेत)

पुढील कारवाईसाठी प्राज आणि प्रज्वल यांस अहमदाबाद येथे नेण्यात आले आहे .या घटनेला शिराळा पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम यांनी दुजोरा दिला आहे.

 कुंभमेळा अंतिम टप्प्यात

महाकुंभाचा शेवटचा दिवस 26 फेब्रुवारी रोजी म्हणजेच महाशिवरात्री स्नान आहे. या काळात भाविकांची मोठी गर्दी होण्याची अपेक्षा आहे. जिल्हा प्रशासन आणि मेळावा प्रशासनाने यासाठी आधीच तयारी केली आहे. डीएम रवींद्र कुमार मंदार यांनी  IANS ला सांगितले की, मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आली आहे. महाकुंभमेळ्यादरम्यान यात्रेकरूंना आनंददायी अनुभव मिळावा यासाठी अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. मुख्य सचिव आणि डीजीपी यांनी आढावा बैठक घेतली आणि तयारीचा वैयक्तिक आढावा घेतला. महाकुंभात काही समस्या असल्यास, ती त्वरित सोडवण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या जात आहेत, असे डीएम म्हणाले.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: