जाहिरात

Vasai Crime: पालिका अधिकाऱ्यांची बदनामी अन् ब्लॅकमेलिंग; सराईत गुन्हेगार अखेर अटकेत

त्याच्याविरोधात बदनामीच्या 8 गुन्ह्यांसह एकूण 15 गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.

Vasai Crime: पालिका अधिकाऱ्यांची बदनामी अन् ब्लॅकमेलिंग; सराईत गुन्हेगार अखेर अटकेत

मनोज सातवी, मुंबई: महापालिका अधिकार्‍यांची वैयक्तिक माहिती मिळवून, त्यांना बदनामीची भिती दाखवून ब्लॅकमेल करणाऱ्या नराधमास अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. चंदन ठाकूर असे या आरोपीचे नाव असून त्याच्याविरोधात बदनामीच्या 8 गुन्ह्यांसह एकूण 15 गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

याबाबत सविस्तर माहिती अशी की, वसई विरार, तसेच मीरा भाईंदर महापालिकेच्या अधिकार्‍ यांचे फोटो मार्क करून, त्यांची वैयक्तिक माहिती मिळवून, अश्लील मजकूर लिहून बदनामी करण्याच्या नावाने धमकावून ब्लॅकेमल करणाऱ्या चंदन ठाकूर या सराईत आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. 15 पेक्षा जास्त अधिकार्‍यांना त्याने त्रास दिला होता.

वसई विरार महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे, तसेच, उपायुक्त दिपक सावंत यांची देखील समाजमाध्मयावरून अश्लील मजकूर प्रसारीत करून बदनामी कऱण्यात आली होती. या प्रकरणी त्यांनी बोळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. असाच प्रकार मिरा भाईंदरच्या महापालिका अधिकार्‍यांच्या बाबतीतही घडला होता. त्यामुळे गुन्हे शाखा 3 च्या पथकाने या प्रकऱणाचा तपास सुरू केला होता.

( नक्की वाचा : राजकारण्यांचा साहित्य संमेलनाशी संबंध काय? शरद पवारांनी थेट सांगितलं )

दरम्यान, सायबर गुन्हे शाखेच्या मदतीने गुन्हे शाखा 3 चे प्रमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक शाहूराज रणावरे यांच्या पथकाने त्याचा तांत्रिक तपास केला आणि विरारच्या ग्लोबल सिटी येथून चंदन ठाकूर या आरोपीला अटक केली. चंदन ठाकूर यांच्या विरोधात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये 15 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: