सुनील दवंगे, प्रतिनिधी
Sangamner Crime News : संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथे दत्तधाम सरकार नावाने स्वयंघोषीत महाराज राजेंद्र गडगे आश्रम चालवायचा.धार्मिक विधी आणि होम हवन करून कर्करोगासारखे दुर्धर आजार बरे करण्याबाबत भोंदू गडगे त्याच्या यू-ट्यूब चॅनलला माहिती पसारित करायचा.गडगे महाराज भक्तांकडून फसवणूक करून मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडून पैसै वसूल करायचा,अशी माहिती उघडकीस आली.याप्रकरणी काही लोकांनी अंधश्रध्दा निर्मुलन समीतीच्या राज्य सचिव आणि वकील रंजना गवांदे यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर गवांदे यांनी पोलीस आणि जिल्हा प्रशासनाला निवेदन देत कारवाई करण्याची मागणी केली.यां संपूर्ण प्रकरणाची दखल घेत पोलिसांनी भोंदूबाबा गडगेला आज पहाटे अटक केली आहे.
त्या सदस्यांनी संगमनेर तालुका पोलिसांकडे तक्रार दाखल केली अन्..
"मी अकरा किंवा एक्कावन्न हजार देणगी घेत नाही व त्याची एक तरी पावती दाखवा",असा सवाल या भोंदूबाबाने माध्यमांशी बोलताना उपस्थित केला. मंत्राने कर्करोग बरा करतो, असं मी बोललोच नसल्याचंही गडगे भोंदूने म्हटलं आहे. तसच त्याने त्याच्या यू-ट्यूब चॅनलद्वारे खोटी माहिती प्रसारित करण्याचा प्रयत्नही केल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समीतीच्या सदस्यांनी संगमनेर तालुका पोलिसांकडे तक्रार दाखल केली. रमेश गडगे,त्याची मुलगी न्यानेश्वरी गडगे, डॉक्टर मोहन पूरी तसेच सूरज व मधुकर शिंदे याच्या विरोधात फिर्याद दाखल केली.
नक्की वाचा >> Ambarnath News: अंबरनाथमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात भयंकर घटना, पोलिसांनाही धक्काबुक्की, Video व्हायरल
पोलिसांनी जादूटोणा विरोधी कायदा आणि मेडिकल प्रॅक्टिशनर ॲक्ट तसेच अन्य विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करत,रमेश गडगे व मधुकर शिंदे या दोघांना अटक केली,अशी माहिती संगमनेर तालुक्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंके यांनी दिली आहे. दरम्यान, राजेंद्र गडगे करत असलेल्या भोंदूगिरी विरोधात यापूर्वीही काही तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र प्रशासनाने याप्रकरणाकडे दुर्लक्ष का केलं,असा सवालही उपस्थित केला जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world