शरद सातपुते, सांगली:
Sangli Crime: नाशिकमधील अशोक खरात, सोलापूरच्या मनोहर मामा शिंदे प्रकरणाने अवघा महाराष्ट्र हादरल्याचे पाहायला मिळाले. मात्र भविष्य पाहण्याच्या नावाखाली भोंदुगिरी करत अनेकांना लुटल्याच्या घटना वारंवार वाढत चालल्या आहेत. आता अशीच आणखी एक घटना सांगलीमधून समोर आली आहे. सांगलीच्या विटा येथे एका भोंदुबाबाने महिलेला लुटल्याचं समोर आलं आहे.
तीन भोंदुबाबांकडून महिलेची फसवणूक
याबाबत सविस्तर माहिती अशी की, आमच्या अनेक थोर महापुरुष येत असल्याचा बनाव करत एका कुटुंबाला नरबळी व गर्भपातचा सल्ला देऊन शारीरिक व आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार सांगलीच्या विटा येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी विटा पोलीस ठाण्यामध्ये तिघा भोंदू विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विटा येथील कडेश्वर धाम आध्यात्मिक संस्थेच्या माध्यमातून तिघा भोंदूंकडून एका महिलेला तिच्या कुटुंबीयांचे प्रश्न सोडवण्यासाठी नरबळी व गर्भपात करण्याचा धक्कादायक सल्ला देत शारीरिक व आर्थिक फसवणूक करण्यात आली. तसेच उपचाराच्या नावाखाली पीडित महिलेच्या पतीला काठीने मारहाण देखील करण्यात आल्याची तक्रार पीडित महिलेने विटा पोलीस ठाण्यात दिली आहे. फिर्यादीनंतर विटा पोलिसांकडून महेश बाबर,संकेत निकम आणि सुरज उपाध्याय या तिघां विरोधात जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोल्हापुरात भरदिवसा खुनाची घटना
पूर्ववैमनस्यातून आणि सोशल मीडियावरील ग्रुपवर झालेल्या कमेंटचा राग मनात धरून जयसिंगपूर येथे भरदिवसा तरुणाचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना घडली. याप्रकरणी राजू लक्ष्मण कांबळे याला पोलिसांनी अटक केलीये.. आरोपी राजू कांबळे आणि साहिल यांच्यात गाडीच्या कर्जाचे हप्ते भरण्यावरून जुना वाद होताया च वादातून सोशल मीडियावरील ग्रुपवर काही कमेंटस केल्या होत्या. या कमेंटसचा राग मनात धरून आरोपीने साहिलला चर्चेसाठी बोलावले होते. चर्चा सुरू असतानाच वाद वाढत गेला. यावेळी राजूने आपल्याजवळील चाकूने साहिलच्या छातीवर व दंडावर सपासप वार केले. दुपारी तीनच्या सुमारास घडलेल्या घटनेने शहरात खळबळ उडाली. जयसिंगपूर पोलिसात या खुनाची नोंद आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world