Akola News: अकोल्यात 'या' उच्चभ्रू सोसायटीत सुरु होता घाणेरडा प्रकार, कुंटणखाण्यात फॉरेनर महिला अन् 3 जण..

अकोल्याच्या खदान पोलीस स्टेशन हद्दीत सुरू असलेल्या हायप्रोफाईल देहविक्री रॅकेटचा पोलिसांनी आज सायंकाळी पर्दाफाश केला आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Akola Prostitution Crime News

योगेश शिरसाट, प्रतिनिधी 

Akola Crime News : अकोल्याच्या खदान पोलीस स्टेशन हद्दीत सुरू असलेल्या हायप्रोफाईल देहविक्री रॅकेटचा पोलिसांनी आज सायंकाळी पर्दाफाश केला आहे. गौरक्षण रोड परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये सुरू असलेल्या या अनैतिक धंद्यावर पोलिसांनी छापा टाकत दोन महिला आणि एका पुरुषाला ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या महिलांपैकी एक महिला तांझानिया, ईस्ट आफ्रिका येथील असल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

अकोला शहरातील गौरक्षण रोड परिसर हा उच्चभ्रू आणि शांत भाग म्हणून ओळखला जातो. मात्र याच भागातील एका अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये गुपचूपपणे देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याचा प्रकार पोलिसांच्या कारवाईतून उघडकीस आला आहे. त्यादरम्यान, स्थानिक नागरिकांना सुरुवातीला या प्रकाराची कल्पनाही नव्हती. परंतु काही दिवसांपासून त्या फ्लॅटमध्ये ये-जा करणाऱ्या अनोळखी व्यक्तींमुळे परिसरात संशयाचे वातावरण निर्माण झाले होते.

Advertisement

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार एका महिलेने विदेशी महिलेला सोबत घेऊन या ठिकाणी कुंटणखाना चालवण्याचा धंदा सुरू केला होता. बाहेरून ग्राहकांना बोलावून त्यांच्याकडून पैसे घेत अनैतिक व्यवहार केला जात असल्याची माहिती पोलिसांच्या गुप्त पथकाला मिळाली होती. या माहितीची खात्री करण्यासाठी पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून संपूर्ण व्यवहाराची माहिती घेतली. खात्री झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभाग आणि खदान पोलीस स्टेशनच्या पथकाने संयुक्तपणे या अपार्टमेंटवर छापा टाकत कारवाई केली.

नक्की वाचा >> Dombivali News: पतीला 71 लाखांचा गंडा घातला, पत्नीच्या सतर्कतेमुळे बोगस CBI अधिकाऱ्यांचा पर्दाफाश, प्रकरण काय?

पोलिसांनी अचानक धाड टाकली अन्..

पोलिसांनी अचानक धाड टाकताच फ्लॅटमध्ये सुरू असलेला अनैतिक प्रकार उघडकीस आला. कारवाईदरम्यान दोन महिला आणि एक पुरुष फ्लॅटमध्ये नको त्या अवस्थेत आढळून आले. पोलिसांनी तात्काळ तिघांनाही ताब्यात घेत खदान पोलीस स्टेशनमध्ये आणले. ताब्यात घेतलेल्या महिलांपैकी एक महिला तांझानिया, ईस्ट आफ्रिका येथील असल्याची माहिती समोर आली आहे. विदेशी महिला या प्रकरणात आढळून आल्याने या देहविक्री रॅकेटचे स्वरूप अधिक गंभीर असल्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे. पोलिसांनी या तिघांची चौकशी सुरू केली असून या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच या मागे मोठे जाळे कार्यरत आहे का, याचा तपासही केला जात आहे.

व्हाट्सअॅपवर पाठवले तरुणींचे फोटो 

प्राथमिक चौकशीतून या रॅकेटबाबत काही धक्कादायक माहिती समोर आली आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून तरुणींचे फोटो पाठवले जात होते. त्यानंतर ग्राहकांशी संपर्क साधून सौदे ठरवले जात होते. प्रत्येक ग्राहकाकडून तीन ते चार हजार रुपये घेत हा देहविक्रीचा व्यवसाय चालवला जात असल्याची माहिती पोलिसांच्या तपासातून समोर आली आहे. काही गरजू महिला आणि तरुणींना पैशांचे आमिष दाखवून या व्यवसायात ढकलले जात असल्याची बाबही प्राथमिक चौकशीतून उघड झाली आहे.

नक्की वाचा >> Akola News: प्रवाशांना अलर्ट करणारी घटना, अकोला शहरात एसटी बसला अपघात, 2 वाहनांना धडक दिली अन्..

यादरम्यान, पोलिसांनी छापा टाकल्यानंतर घटनास्थळी जवळपास दीड ते दोन तास नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. उच्चभ्रू वस्तीमध्ये असा प्रकार सुरू असल्याचे समोर आल्यानंतर परिसरात चर्चांना उधाण आले आहे. या प्रकरणी अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास खदान पोलीस स्टेशनकडून सुरू आहे.

Advertisement