जाहिरात

Dombivali News: पतीला 71 लाखांचा गंडा घातला, पत्नीच्या सतर्कतेमुळे बोगस CBI अधिकाऱ्यांचा पर्दाफाश, प्रकरण काय?

डोंबिवलीमध्ये सायबर फसवणुकीचे एक मोठे प्रकरण उघडकीस आले आहे.सीबीआयचा अधिकारी असल्याची बतावणी करत दोन जणांनी डोंबिवलीतील महेश आगारकर यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली आणि त्याच्याकडून 71 लाख रुपये उकळले.

Dombivali News: पतीला 71 लाखांचा गंडा घातला, पत्नीच्या सतर्कतेमुळे बोगस CBI अधिकाऱ्यांचा पर्दाफाश, प्रकरण काय?
Dombivali Fake CBI Officer Crime News
मुंबई:

Dombivali Crime News Today : डोंबिवलीमध्ये सायबर फसवणुकीचे एक मोठे प्रकरण उघडकीस आले आहे.सीबीआयचा अधिकारी असल्याची बतावणी करत दोन जणांनी डोंबिवलीतील महेश आगारकर यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली.त्याच्याकडून 71 लाख रुपये उकळून त्याची मोठी आर्थिक फसवणूक केली आहे. आगरकर यांच्या पत्नीच्या सतर्कतेमुळे फसवणूक उघड झाली आहे.महेश आगरकर यांनी टिळकनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या  तक्रारीच्या आधारे आरोपी संदीप कुमार राव आणि करण शर्मा या दोघांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल  करण्यात आला आहे. 

या प्रकरणातील तक्रारदार आगरकर यांनी  पोलिस ठाण्यात दिले्लया तक्रारीत म्हटले आहे की,मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्यांना एक फोन आला.फोन करणाऱ्याने स्वतःची ओळख  भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणात अधिकारी पदावर आहे. आगरकर यांच्या मोबाईल फोनवरून महिलांना आक्षेपार्ह मेसेज  पाठवण्यात आले आहेत.घाटकोपर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांना कळवण्यात आले की,या प्रकरणाचा तपास सीबीआय करत असून पुढील तपासासाठी त्यांचा मोबाईल फोन जप्त केला जाईल. 

नक्की वाचा >> Pune News : पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी, 'या' पिकांचं होणार मोठं नुकसान, कारण काय?

दोघांनी मिळून आगरकर यांना धमकावले आणि..

त्यानंतर थोड्याच वेळेत संदीप कुमार राव यांनी आगरकर यांच्याशी संपर्क साधून आगरकर यांच्या बँक खात्यांमध्ये अनियमितता असल्याचा आरोप केला.तर करण शर्माने आपण बँकेचे कमिशन एजंट असल्याचा दावा करत हे प्रकरण गंभीर असल्याचे सांगितले.दोघांनी मिळून आगरकर यांना धमकावले आणि जाळ्यात अडकवले. आरोपीने आगरकर यांना सर्वोच्च न्यायालयाचे बनावट आदेश पाठवले. खटला टाळण्यासाठी त्याने आधी 7 लाख रुपये,नंतर 9 लाख रुपये आणि शेवटी 54 लाख रुपये जमा करावेत.त्यांनी त्याला आश्वासन दिले की संपूर्ण रक्कम नंतर परत केली जाईल. 

हे एकून भितीपोटी आगरकर यांनी 71 लाख रुपये आरोपींना हस्तांतरीत केले. त्यानंतर या प्रकरणाचा आगरकर यांना संशय आला.त्यांनी ही बाब त्यांच्या पत्नीला सांगितली. आगरकर यांच्या पत्नीने आरोपींना काही प्रश्न विचारले. त्याची समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत.आरोपींनी पाठविलेल्या कागदपत्रांची पडताळणी केली असता ती बनावट असल्याचे उघड झाले.त्यातून ही फसवणूक उघडकीस आली.

नक्की वाचा >>Kalyan News: कल्याणच्या गांधारी रिंग रोडवर गाड्यांची थरारक रेसिंग, नागरिकांचा जीव धोक्यात, व्हिडीओ व्हायरल

आगरकर यांनी टिळकनगर पोलिस ठाण्यात धाव घेतली.यासंदर्भात डोंबिवलीचे सहाय्यक पोलिस आयुक्त सुहास होमाडे यांनी सांगितले की,आरोपींच्या तपासाकरीता पोलिस पथक रवाना झाले आहे.टिळकनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक विजय कदम यांनी सांगितले की आरोपीचा शोध सुरु केला आहे.त्यांच्या बँक व्यवहारांचीही चौकशी करण्यात येत आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com