जाहिरात

Panvel News: पनवेलमध्ये पोलीस उपनिरीक्षक 50 हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक

सार्वजनिक पदावर असलेल्या एका पोलिस अधिकाऱ्याकडून असा प्रकार घडणे ही अत्यंत गंभीर बाब मानली जात आहे.

Panvel News: पनवेलमध्ये पोलीस उपनिरीक्षक 50 हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक
पनवेल:

राहुल कांबळे

नवी मुंबईच्या पनवेल शहर पोलीस ठाणे  येथे कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक सचिन वामन वाईकर यांना लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.  50 हजार रुपयांची लाच ते  स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना रंगेहाथ अटक केली आहे. लाच घेण्याच्या या प्रकारात वाईकर यांच्यासह रविंद्र उर्फ सचिन सुभाष बुट्टे या खाजगी इसमालाही पोलिसांनी अटक केली आहे.

तक्रारदाराच्या वडिलांविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये कलम वाढवण्याची तसेच जामिन नाकारून अटक करण्याची धमकी देण्यात आली होती. ही धमकी उपनिरीक्षक वाईकर यानीच दिली होती. असे आपण करू नये यासाठी त्यांनी 1 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. मात्र, नंतर तडजोडी अंती 50,000 रुपयांमध्ये व्यवहार निश्चित करण्यात आला होता. तक्रारदाराने हा प्रकार थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) तक्रारीद्वारे कळवला होता. त्यानंतर लगेचच पथकाने सापळ्याचे नियोजन केले.

नक्की वाचा - Javed Sheikh: काम ड्राव्हरचं, घर पत्र्याचं, तरही 500 कोटीचा मालक, कोण आहे जावेद शेख?

21 जुलै 2025 रोजी रात्री 10.30 वाजता, पनवेलमधील श्री मारुती कुशनजवळ, शिवाजी चौक, जुना पनवेल येथे लाचलुचपत विभागाने कारवाई केली. पोलीस उपनिरीक्षक वाईकर यांनी लाच रक्कम त्यांच्या व्हॅगन आर कारमध्ये खाजगी इसम रविंद्र बुट्टे यांच्यामार्फत स्वीकारली होती. सापळा रचताच दोघांनाही ACB ने रंगेहाथ अटक केली. या लाच प्रकरणी दोघांविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

नक्की वाचा - Food News: केळी खाणे कोणी टाळावे? 'या' लोकांसाठी केळी आहेत विषसमान, डॉक्टरांनी काय सांगितलं?

सार्वजनिक पदावर असलेल्या एका पोलिस अधिकाऱ्याकडून असा प्रकार घडणे ही अत्यंत गंभीर बाब मानली जात आहे. एका सामान्य नागरिकाच्या अडचणींचा गैरफायदा घेत अटक आणि कलम वाढवण्याच्या नावाखाली आर्थिक मागणी केली गेली होती. या प्रकारामुळे  पोलीस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे आहे. ACB च्या यशस्वी कारवाईमुळे पनवेल शहर आणि पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. लाचखोरीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अशा कारवायांनी इशारा मिळतो, अशी प्रतिक्रिया जनतेतून उमटत आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com