संजय तिवारी, प्रतिनिधी
Nagpur Crime : नागपुरातील शिवसेनाच्या शिंदे गटाचे शहरं प्रमुख मंगेश काशीकर यांच्या हॉटेल NH1 हॉटेल धाब्यावर पोलिसांनी कारवाई केल्याचं समोर आलं आहे. शिंदे गटाच्या या नेत्याच्या हॉटेलमध्ये अवैध दारूसाठा करण्यात आला होता, तो पोलिसांच्या कारवाईत जप्त करण्यात आला आहे. या जप्तीनंतर पोलिसांनी नेत्याचं दुसरं हॉटेल बकासुरवरही कारवाई केली आहे.
या दोन्ही हॉटेल पुढील पंधरा दिवस बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नागपूर पोलिसांनी कारवाई करीत करीत हॉटेलला कुलूप ठोकलं आहे. यासोबतच पोलिसांनी हॉटेल संचालक मंगेश काशीकर आणि भरत दुबे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख मंगेश काशिकर यांना एनएच 1 हॉटेल पंधरा दिवस बंद ठेवण्याचे आदेश पोलिसांनी दिलेले आहे.
नक्की वाचा - Nagpur : ती आली, रिंग उचलली आणि गायब झाली! प्रसिद्ध ज्वेलरी शॉपला गंडा घालणाऱ्या लेडी थीफचा शोध सुरु, पाहा Video
या संदर्भात बजाज नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अजय मानकर यांनी सांगितले की, बजाज नगर पोलीस स्टेशन येथील दोन हॉटेलांवर कारवाई करण्यात आली आहे. जिथे अवैधरित्या दारू आढळून आली. यामध्ये मालकांवर गुन्हा दाखल करून 15 दिवस हॉटेल बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याआधी सुद्धा अशा पद्धतीचे अवैध दारूसाठी करण्यात आला होता. वारंवार अशा घटना होत असल्याने हॉटेल बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.