जाहिरात
This Article is From Aug 11, 2024

5 किलो बटाट्याची मागितली लाच, तीनवर ठरलं; पोलिसाची ऑडिओ क्लिप व्हायरल 

पोलिसाने पाच किलो बटाट्याची लाच मागितल्याचा एक विचित्र प्रकार समोर आला आहे.

5 किलो बटाट्याची मागितली लाच, तीनवर ठरलं; पोलिसाची ऑडिओ क्लिप व्हायरल 
लखनऊ:

उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh Crime) कन्नौजमध्ये पाच किलो बटाट्याची लाच मागितल्याचा एक विचित्र प्रकार समोर आला आहे. पाच किलो बटाट्यांमुळे पोलीस चौकीच्या प्रमुखाला नोकरी गमवावी लागली. पोलीस ठाण्याचा प्रमुख आणि तक्रारदाराचा एक ऑडिओ व्हायरल झाला आहे. ज्यात दोघांमध्ये एका कामासाठी बटाट्यांची लाज दिल्याचा उल्लेख होता. 

कन्नौज जिल्ह्यातील सौरिख पोलीस ठाणे क्षेत्रातील चपुन्ना पोलीस चौकीचे प्रमुख रामकृपाल सिंह आणि तक्रारदारांचा ऑडिओ व्हायरल झाला होता. ज्यात लाच म्हणून बटाटे मागण्यात आले होते. या ऑडिओमध्ये पाच किलोऐवजी दोन किलो बटाटे देता येऊ शकत असल्याचं म्हटलं होतं. पोलीस चौकीच्या प्रमुखांना याचा विरोध केला आणि पाच किलो बटाटेवर कायम राहिले. 

नक्की वाचा - क्षुल्लक कारणाने वाद, कुख्यात गुंड राजू शिवशरणची पुण्यात हत्या

चौकीच्या प्रमुखाची हकालपट्टी, तपास सुरू...
याबाबत तक्रारदाराने सांगितलं की, काम फारसं चांगलं सुरू नाही. त्यामुळे पाच किलो बटाटे नाही तर केवळ दोन किलो बटाटे देऊ शकत असल्याचं तक्रारदाराने सांगितलं. त्यानंतर पोलिसाने पाचऐवजी तीन किलो बटाटे देण्यास सांगितले. दोघांच्या संभाषणाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यानंतर कनौजचे एसपी अमित कुमार आनंद यांनी चौकीच्या प्रमुखाची हकालपट्टी केली आहे. 


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: