सुरज कसबे
नवी मुंबईतल्या शिळफाटा इथं झालेली विवाहीत महिलेची हत्या आणि बलात्कार , त्यानंतर उरणमध्ये झालेल्या तरूणीची निर्घुण हत्या. या दोन्ही घटनांनी संपुर्ण महाराष्ट्र हादरला असताना पिंपरी चिंचवडमध्येही असाच काहीसा प्रकार घडला आहे. एकतर्फी प्रेमातून एका 21 वर्षीय तरूणीचा खून करण्यात आला आहे. भर रस्त्यात तिच्यावर चाकूने वार करण्यात आले. खून केल्यानंतर आरोपी मोटरसायकलने आपल्या गावी पळून जात होता. त्याच वेळी पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. विशेष म्हणजे हे दोघेही एकाच गावचे होते.
('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
प्राची विजय माने. ही मुळची सांगली जिल्ह्यातील रहिवाशी होती. तर अविराज खरात हा ही तिच्याच गावचा. दोघेही सांगलीच्या महाविद्यालयात शिकत होते. या दोघांत पहिले प्रेम संबध होते. त्यामुळे अविराज याने प्राची बरोबर लग्न करण्याची इच्छा तिच्या घरच्यां समोर व्यक्त केली होती. त्याने तशी मागणीही घातली होती. पण तिच्या घरच्यांना हे नाते मान्य नव्हते. त्यांनी अविराज याला नकार दिला होता. तेव्हा पासून अविराज हा अस्वस्थ होता. त्याला काय करावे हे समजत नव्हेत. तो प्राचीला कोणत्याही स्थितीत आपली बायको करण्यासाठी पेटला होता.
सांगलीतले शिक्षण पुर्ण झाल्यानंतर प्राची ही नोकरीसाठी पुण्यात आली होती. ती चाकण एमआयडीसी परिसरात कामालाही जात होती. त्याच परिसरात ती गेल्या सहा महिन्यापासून राहते. त्यावेळी अविराज याने तिला भेटून आपण लग्न करू असे सांगितले होते. पुन्हा त्याने तिची भेट घेतली होती. शिवाय लग्नाचं तो बोलत होता. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. त्यामुळे अविराज खरात संतापला. त्याने कसलाही विचार केला नाही. त्याने जवळ आणलेल्या चाकूने तिच्या गळ्यावर आणि पोटावर सपासप वार केले.
या हल्ल्याने प्राची तिथेच कोसळली. त्यानंतर आरोपी अविराज याने तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्याच्याकडे मोटारसायकल होती. त्यावरून तो सांगलीच्या दिशेने पळत होता. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही चेक केले. त्यात आरोपी दिसून आला. पोलिसांनी त्याला सांगली जिल्ह्याच्या हद्दीत पुणे -बेंगलोर महामार्गावर अटक केले. खून केल्यानंतर अवघ्या 12 तासात पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेने आरोपीला बेड्या ठोकल्या.