जाहिरात

Lonavala News : पुण्यात MPSC ची तयारी, लोणावळ्यात नाश्त्यासाठी थांबला अन् भयंकर घडलं; फेरफटका जीवावर बेतला

तरुणाचे वडील प्रसिद्ध व्याख्याते असून त्यांनी 'वऱ्हाड निघालय लंडनला' या एकपात्री प्रयोगाचे पाचशेपेक्षा अधिक प्रयोग राज्यभर सादर केले आहेत

Lonavala News : पुण्यात MPSC ची तयारी, लोणावळ्यात नाश्त्यासाठी थांबला अन् भयंकर घडलं; फेरफटका जीवावर बेतला

Lonavala News : प्रवासाला निघाल्यानंतर निसर्गरम्य ठिकाण दिसलं की मोह आवरत नाही. थोडा वेळ का होईना रिलॅक्स होण्यासाठी प्रवासादरम्यान आपली पावलं तिकडे वळतात. अशातच एक धक्कादायक प्रकार घडला आहे. निसर्गरम्य ठिकाण पाहून हा तरुण फेरफटका मारायला गेला, पण त्याच्यासोबत अनर्थ घडला. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील तरुणाचा घराच्या दिशेने परतत असताना त्याच्यासोबत भयंकर घडलं. 

लोणावळ्यात थांबले अन् अनर्थ घडला...

मेहकर येथील प्रसिद्ध व्याख्याते प्रा. वसंत गिरी यांचा २६ वर्षीय पुत्र प्रज्वल गिरी याचा ८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी लोणावळा येथील दरीत कोसळून त्याचे दुर्दैवी मृत्यू झाला. प्रज्वल गिरी हा पुणे येथे बीएडचे शिक्षण घेत होता. तिथेच तो एमपीएससी परीक्षेची तयारी करीत होता. ८ फेब्रुवारी रोजी प्रज्वल हा त्याच्या नातेवाइकांसोबत कारने मुंबईहून पुण्याला येत होता. लोणावळा येथे अल्पोपहार करण्यासाठी ही मंडळी थांबली. परंतु प्रज्वल आणि त्याचा मावसभाऊ या दोघांनी आम्ही टेकडीवरून फिरून येतो, असं सांगितले. मात्र टेकडीवर फेरफटका मारायला जाणं त्याच्या जीवावर बेतलं. तेथून फिरत असताना पाय घसरून प्रज्वल खोल दरीत कोसळला. त्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

नक्की वाचा - मध्यरात्री 2.30 वाजता तन्वीर मदतीला उभा राहिला; अशी रोखली टँकरमधील गॅस गळती

प्रा. वसंत गिरी मेहकर यांच्या मुलाचा मृत्यू...

प्रज्वलचे वडील प्रा. वसंत गिरी मेहकर येथील मेएसो महाविद्यालयातून सेवानिवृत्त झाले आहेत. 'वऱ्हाड निघालय लंडनला' या एकपात्री प्रयोगाचे त्यांनी पाचशेपेक्षा अधिक प्रयोग राज्यभर सादर केले आहेत. क्रांतिकारकांच्या जीवनावर आधारित नाट्यप्रयोगाचे त्यांनी हजारावर सादरीकरण केले आहे. त्यांची पाच पुस्तके प्रसिद्ध आहेत. एकुलत्या एक मुलाचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे या कुटुंबावर मोठं दुःख कोसळलं आहे. घटनेची माहिती मिळताच गिरी कुटुंबीय रात्री उशिरा पुण्याकडे रवाना झाले. प्रज्वलच्या मृतदेहावर मेहकर येथे १० फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com