आकाश सावंत, प्रतिनिधी
Beed District Jail Prisoner Death : बीड जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या एका कैद्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. यामुळे कारागृह परिसरात खळबळ उडाली आहे. गणेश पवार (वय अंदाजे 50) असं मृत कैद्याचं नाव आहे. कैदी पवार चेक बाउन्स प्रकरणात न्यायालयीन कोठडीत होता आणि आठ दिवसांपूर्वीच त्याला बीड जिल्हा कारागृहात दाखल करण्यात आले होते. याच कारागृहात वाल्मिक कराड, ज्ञानराधा मल्टिस्टेटच्या माध्यमातून ठेवीदारांच्या कोट्यावधी रुपयांना गंडा घालणारा आरोपी सुरेश कुटे, राजस्थानी मल्टिस्टेट फसवणूक प्रकरणातील आरोपी चंदूलाल बिहानी कैद आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, आज शनिवारी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास गणेश पवार यांच्या छातीत अचानक तीव्र वेदना जाणवू लागल्या. प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांनी याबाबत कारागृहातील कर्मचाऱ्यांना माहिती दिली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत कारागृह प्रशासनाने तत्काळ हालचाल करत त्याला बीड जिल्हा रुग्णालयातात उपचारासाठी दाखल केले. मात्र रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्रकृती अधिकच खालावली आणि डॉक्टरांनी तपासणी केली आणि त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
नक्की वाचा >> Akola News : अकोल्यात आर्मी जवानाची हत्या, मित्रांचं कनेक्शन आलं समोर, दारूच्या नशेत असं काही घडलं..
घटनेचा पंचनामा सुरु
या घटनेनंतर कारागृह प्रशासन आणि पोलिसांकडून आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणी जिल्हा न्यायालयातील न्यायाधीश तसेच पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला असून पुढील तपास प्रक्रिया सुरू आहे. मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट करण्यासाठी शवविच्छेदनही करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
नक्की वाचा >> महाराष्ट्राला लागले आषाढीचे वेध, 'या' तारखेला संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे प्रस्थान, वाचा संपूर्ण वेळापत्रक
अचानक घडलेल्या या घटनेमुळे जिल्हा कारागृहात आणि संबंधित वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. कारागृहात दाखल झाल्यानंतर अवघ्या आठ दिवसांत कैद्याचा मृत्यू झाल्याने या घटनेची नोंद गंभीर स्वरूपात घेतली जात असून प्रशासनाकडून सर्व बाबींची पडताळणी करण्यात येत आहे.