Pune Crime : पुण्यात मैत्री आणि मत्सराचा एक भयंकर प्रकार समोर आला आहे. येथे १५ वर्षांच्या तीन मुलांनी मुलीच्या नावाचं फेक सोशल मीडिया प्रोफाइल तयार करीत आपल्या समवयस्क मित्राची हत्या केली. हा प्रकार पाहून पोलिसही हादरले. ज्याला मित्र म्हणत होते त्याचाच जीव घेतला.
काय आहे प्रकरण?
या तीन मुलांनी एक फेक सोशल मीडिया प्रोफाइल तयार केली होती. ही प्रोफाइल एका मुलीची होती. तिघांनी आपल्या मित्राला या मुलीच्या प्रोफाइलवरुन भेटायला बोलावलं. तो भेटायला आला त्यानंतर मित्राला खूप मारहाण केली आणि त्याचा मृतदेह मुठा नदीत फेकुन दिला. ही घटना २६ जानेवारी रोडजी घडली.
प्रकरण उघडकीस कसं आलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलाच्या आईने मंगळवारी पोलीस ठाण्यात मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. मुलगा आपल्या आईच्या फोनवरुन सोशल मिडिया अकाऊंट चालवित होता. जेव्हा मुलाच्या भावाने त्याचा प्रोफाइल चेक केला तेव्हा त्यावर मुलीचा मेसेज आल्याचं दिसलं. सुरुवातीला पोलिसांना वाटतं की मुलीचं प्रकरण असेल. मात्र तपासादरम्यान मुलीच्या नावावर बनावट अकाऊंट तयार करण्यात आलं होतं. या प्रोफाइलच्या माध्यमातून मुलाला फूस लावून बोलावण्यात आलं होतं. डिजिटल पुराव्यांनुसार, पोलिसांनी या फेक प्रोफाइलची माहिती मिळवली. ही प्रोफाइल एका १५ वर्षांच्या मुलाची होती. जेव्हा पोलिसांनी त्याची चौकशी केली तर त्याने सर्व सत्य सांगितलं. त्याने सांगितलं की, त्याने दोन मित्रांसोबत मिळून त्या मुलाची हत्या केली होती आणि नंतर त्याचा मृतदेह मुठा नदीत फेकून दिला.
हत्येचं धक्कादायक कारण...
पोलीस आणि फायर ब्रिगेडच्या टीमने बुधवारी सायंकाळी मुठा नदीतून मृतदेह शोधून काढला. मात्र त्यांना मृतदेह मिळाला नाही. पोलिसांनी सांगितलं की, मुख्य आरोपी एका मुलीसोबत नात्यात होत्या. मात्र पीडित मुलगा आणि मुख्य आरोपीची प्रेयसी एकमेकांच्या जवळ येत होते. ही बाब मुख्य आरोपीला खटकत होती. यातूनच त्याने तीन मित्रांच्या मदतीने आरोपीचा काटा काढला.