Pune Crime : Night Shift ला जाणाऱ्या महिलेला भररस्त्यात अडवलं, कंपनीजवळच महिलेच्या शरीराचे तोडले लचके

या घटनेनंतर पुण्यातील सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

चाकण MIDC कंपनीत रात्रपाळीसाठी निघालेल्या एका महिलेवर बलात्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर पुण्यातील सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. 13 मे च्या रात्री 11 च्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा

या प्रकरणी नराधम प्रकाश भांगरेला चोवीस तासांत बेड्या ठोकण्यात आल्या आहे. 27 वर्षीय महिला रात्रपाळीच्या कामासाठी निघाली होती. एका कंपनीत ही पीडित हेल्पर म्हणून काम करीत गोती. मेदनकरवाडी येथील या कंपनीच्या अगदी जवळ ती पोहचली. त्याचवेळी नराधमाने तिला जबरदस्तीने शाळेच्या मागील बाजूस ओढून नेले. येथे तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार करून तिला मारहाण करण्यात आली, याशिवाय जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर आरोपी तिथून पसार झाला.

Advertisement

नक्की वाचा - Road Accident : अपघातग्रस्त मित्राला भेटायले निघाल्या, वाटेतच मृत्यूने गाठलं; दोन मैत्रिणी जागीच दगावल्या

प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला पण...
जेव्हा आरोपीने तिला ओढून नेले त्यावेळी पीडितेने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. यात तिने आरोपीला चावाही घेतला. मात्र आरोपीने बळाच्या जोरावर महिलेच्या शरीराचे लचके तोडले. काही वेळाने तिथून जाणाऱ्या काही महिला कामगार आणि पुरुषांची मदत घेत पीडिता चाकण पोलीस ठाण्यात पोहोचली. 

सध्या पीडितेवर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याशिवाय आरोपी नराधम प्रकार भांगरेला याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. सीसीटीव्हीच्या आधारे त्याचा शोध घेण्यात चाकण पोलिसांना यश आलंय. आरोपी मूळचा अहमदनगर जिल्ह्यातील अकोले गावचा असल्याची माहिती आहे. 

Topics mentioned in this article