जाहिरात

Pune Crime : पुण्यातील संतापजनक कृत्य; महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न

रविवारी रात्री पुणे रेल्वे स्थानकाबाहेर एका तरुणाने महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली.

Pune Crime : पुण्यातील संतापजनक कृत्य; महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न

पुण्यातून (Pune News) एक संतापजनक वृत्त समोर आलं आहे. रविवारी रात्री पुणे रेल्वे स्थानकाबाहेर एका तरुणाने महात्मा गांधींच्या (Mahatma Gandhi) पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. या व्यक्तीने भगवी वेशभूषा परिधान केले होते. आरोपीने महात्मा गांधी यांच्या पुतळ्याच्या पायथ्याशी चढून शस्त्राचा वापर करून त्याचं शिर कापण्याचा प्रयत्न केला.

स्थानिक सुरक्षा रक्षकांनी तातडीने हस्तक्षेप केला आणि कोणतेही नुकसान होण्यापूर्वीच हे (Pune Crime) कृत्य रोखले. आरोपीला तत्काळ अटक करण्यात आली असून त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. सुरज शुक्ला असं ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचं नाव आहे. तरुणाने असं कृत्य का केलं याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. पोलिसांकडून त्याचा तपास सुरू आहे. 

Pune News: वारी मार्गावर अल्पवयीन तरुणीवर अत्याचार, 'ते' दोन आरोपी अखेर अटकेत

नक्की वाचा - Pune News: वारी मार्गावर अल्पवयीन तरुणीवर अत्याचार, 'ते' दोन आरोपी अखेर अटकेत

आरोपीकडे होते शस्त्र 
आरोपी गोंधळ घालत पुतळ्याच्या व्यासपीठावर चढला. त्याच्या हातात एक शस्त्रही होते. ज्याच्या मदतीने त्याने पुतळ्याचे नुकसान करण्याचा प्रयत्न केला. हे पाहताच  स्थानिक सुरक्षा रक्षकांनी तातडीने कारवाई केली आणि आरोपीने कोणतेही नुकसान करण्यापूर्वीच त्याला अटक केली.

या घटनेची माहिती पोलिसांनाही देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आरोपीला पोलीस ठाण्यात नेले. पोलीस अधिकाऱ्यांनी पुष्टी केली आहे की आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे आणि त्याची चौकशी केली जात आहे. पुढील तपास सुरू आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com