जाहिरात

Pune News: वारी मार्गावर अल्पवयीन तरुणीवर अत्याचार, 'ते' दोन आरोपी अखेर अटकेत

दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली हे एक गाव आहे. यागावातच पुणे सोलापूर हायवेवर अल्पवयीन तरुणीवर अत्याचार करण्यात आले होते.

Pune News: वारी मार्गावर अल्पवयीन तरुणीवर अत्याचार, 'ते' दोन आरोपी अखेर अटकेत
पुणे:

देवा राखुंडे 

पुण्याच्या दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथील अत्याचार प्रकरणातील दोन संशयित आरोपींना पुणे ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. समीर उर्फ लकी पठाण आणि विकास सातपुते अशी आरोपींची नावे आहेत. या दोघांनाही पोलिसांनी आता जेरबंद केलं आहे. रांजणगाव येथील एका हॉटेलमधून पोलिसांनी  या संशयित आरोपीला ताब्यात घेतल आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज देखील आता समोर आले आहे. यातील समीर उर्फ लकी पठाण हा माळशिरस तालुक्यातील असल्याची माहिती मिळत आहे. तर दुसरा आरोपी विकास सातपुते हा इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील असल्याची सूत्रांची माहिती आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पोलिसांच्या पथकाला रांजणगाव या ठिकाणी आरोपी थांबला आहे, याची खबर मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन कारवाई केली आहे. या कारवाईची ही सीसीटीव्ही दृश्य समोर आली आहेत. त्यात हे दोन आरोपी एका हॉटेलमध्ये बसलेले दिसत आहे. त्या हॉटेलमध्ये कुणी दुसरी दिसत नाही. त्याच वेळी पोलिस एक एक करून आत येतात. नंतर अचानक त्यांच्यावर झडप टाकतात. त्यावेळी तिथून पळून जाण्याचा ते प्रयत्न करत असताना दिसत आहेत. पण पोलिसांनी त्यांना तिथेच अडवले.

ट्रेंडिंग बातमी - Pune News: अरे पुण्यात चाललंय काय? आता 73 वर्षाच्या वृद्धाने केला 27 वर्षीय तरुणीचा विनयभंग

दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली हे एक गाव आहे. या गावाच्या थोडं पुढे एक चहाची टपरी आहे. पुणे सोलापूर महामार्ग इथूनच जातो. त्याच ठिकाणी ही चहाची टपरी आहे. त्यामुळे सोलापूरच्या दिशेने जाताना अनेक जण याच ठिकाणी थांबतात, चहा घेतात आणि पुढे जातात. असचं एक कुटुंब पुण्याहून सोलापूरच्या दिशेने चाललं होतं. पहाटेचे सव्वाचार वाजले असतील. तेही याच चहा टपरीवर चहा घेण्यासाठी उतरले. बाहेर बऱ्या पैकी अंधार होता. त्याच वेळी दोन युवक एका वाहानातून त्या ठिकाणी आले. 

ट्रेंडिंग बातमी - Satara News: अलिशान बंगले, कोट्यवधींच्या गाड्या, 200 कोटींची जमीन, ओझी वाहणारा कामगार कसा बनला करोडपती?

कुणाला काही समजण्या आता त्यांनी त्यांच्याकडचे कोयते बाहेर काढले. कोयत्याचा धाक दाखवून त्यांनी त्या कुटुंबातील सदस्यांकडे असलेले दागिने हिसकावून घेतले. कोयता त्यांनी त्या कुटुंबीयांच्या गळ्यावरच ठेवला होता. त्यामुळे दागिने दिल्या शिवाय पर्याय नव्हता. त्यानंतर त्या नराधमांची नजर त्यांच्या बरोबर असलेल्या 17 वर्षाच्या मुलीवर पडली. त्यांनी त्या मुलीला चहा टपरीच्या मागे नेत अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी तिथून पळ काढला. या घटनेनं हे संपूर्ण कुटुंब हादरून गेलं आहे. 29 जूनला हा प्रकार घडला होता. आता त्या आरोपींना अटक करण्यात आली आहे.     

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com