बोपदेव घाटातील 21 वर्षांच्या तरुणीवर लैंगिक अत्याचार घटनेतील दुसऱ्या आरोपीला शोधण्यात पुणे पोलिसांना यश आलं आहे. पुणे पोलिसांच्या पथकाने उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथून दुसऱ्या आरोपीला अटक केली आहे. अख्तर शेख असं 27 वर्षीय आरोपीचं नाव आहे. आज त्याला पुणे न्यायालयामध्ये हजर केले जाण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तरुणावर अत्याचार करणाऱ्यांमध्ये तीन तरुणांचा समावेश होता. आतापर्यंत दोन आरोपींना पकडण्यात पुणे पोलिसांना यश आलं असून तिसरा आरोपीचा शोधही पुणे पोलिसांकडून सुरू आहे.
काही दिवसांपूर्वी पुण्यातील बोपदेव घाट प्रकरणात पुणे पोलिसांकडून एका आरोपीला अटक करण्यात आली. सात ते आठ दिवसांनंतर पुण्यातील सामूहिक बलात्कार प्रकरणात एका आरोपीला पकडण्यात पुणे पोलिसांना यश आलं. 3 ऑक्टोबरला मध्य रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. गुन्ह्याची नोंद झाल्यानंतर हे सगळं प्रकरण समोर आलं. त्यानंतर पुणे शहरात त्याचे पडसाद पाहायला मिळाले. महिला पुणे शहरात सुरक्षित आहेत की नाही यावर देखील प्रश्न उपस्थित करण्यात आला.
नक्की वाचा - Baba Siddiqui : बाबा सिद्दीकींच्या हत्येमागे धक्कादायक कारण; गेल्या 30 दिवसांपासून सुरू होता हत्येचा प्लान
पुणे पोलिसांकडून जेव्हा तपासणी सुरू करण्यात आली तेव्हा सगळ्यात पहिले एक CCTV फुटेज जरी करण्यात आला होता. ज्यामध्ये तीन मूलं दिसले होते. पण ते आरोपी नसल्याचं स्पष्ट झालं. त्य नंतर दोन आरोपींचे स्केच जारी करण्यात आले. ज्यावर दहा लाखाचं बक्षीस देखील जाहीर केलं होतं. त्यासाठी पुणे पोलिसांना जवळपास 250 हून अधिक कॉल आले होते. पुणे पोलीस आणि गुन्हे शाखेने आरोपींना पकडण्यासाठी 60 हून अधिक पथकं तैनात केली होती. ज्यामध्ये 700 पोलीस कर्मचारी या तपासणी मागे होते. या तिन्ही आरोपींनी हा गून्हा करण्याआधी मद्यप्राशन केलं असल्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे. तर नक्की कशी तपासणी करण्यात आली आणि एका आरोपीला कसं पकडण्यात आलं हे पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
नक्की वाचा - जॅकेट, हातात पांढरा रुमाल; अखेर आरोपीची ओळख पटली! बोपदेव प्रकरणात महत्त्वाची घडामोड
ते म्हणाले, आरोपींना पकडणं सोपं नव्हत कारण घटनास्थळी पुरेसा प्रकाश आणि CCTV कॅमेरे नव्हते. पुणे पोलिसांनी ड्रोनचा वापर करून आजूबाजूच्या रस्त्यांची चाचपणी केली. हजारो सराईत गुन्हेगारांची चौकशी केल्यानंतर सामूहिक बलात्कारामधल्या एका आरोपीची ओळख पटली. तपासानुसार, पोलिसांना कळू नये म्हणून आरोपींना वेगवेगळ्या रस्त्यांचा वापर केला आणि फिरून गेले. तिन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असल्याचं कळताच त्यांचा मोबाइल ट्रेस करण्यात आला. ज्यातून निष्पन्न झालं की तिन्ही आरोपी घटना जेव्हा घडली तेव्हा त्या परिसरात होते. या सगळ्या तपासणीनंतर एका आरोपीला पुण्यातील वार्जे परिसरातून पकडण्यात पुणे पोलिसांना यश आलं.