जाहिरात

Pune News: पोटगी मागितली म्हणून पत्नीशी जबरदस्ती शरीरसंबंध, नंतर गुप्तांगात हळदी कुंकू लावलेले लिंबू पिळले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिलेचे आणि आरोपी पतीचे 2004 मध्ये लग्न झाले होते.

Pune News: पोटगी मागितली म्हणून पत्नीशी जबरदस्ती शरीरसंबंध, नंतर गुप्तांगात हळदी कुंकू लावलेले लिंबू पिळले
पुणे:

सूरज कसबे 

पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे निलख विशालनगर परिसरात अत्यंत किळसवाणा प्रकारा समोर आला आहे. पतीनेच पत्नीवर जादूटोणा केला असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तो प्रकार इतका भयंकर होता की सर्वच जण  आवाक झाले आहेत.  हा प्रकार वर्षभरापूर्वी घडला  असून या प्रकरणी आता सांगवी पोलिसांत पीडित पत्नीने पतीच्या विरोधात तक्रार दिली आहे. कोर्टात पोटगीचा दावा दाखल केल्याच्या रागातून हा सर्व प्रकार घडल्याचे समोर आले आहे. विभक्त राहणाऱ्या पत्नीच्या गळ्याला कोयता लावून पतीने जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले. शिवाय पत्नीच्या गुप्तांगावर हळदी कुंकू लावलेले लिंबू पिळले असं या पीडित पत्नीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीनंतर एकच खळबळ उडाली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिलेचे आणि आरोपी पतीचे 2004 मध्ये लग्न झाले होते. त्यानंतर पती- पत्नी मध्ये चारित्र्याच्या संशयावरून वाद  होत होते. हे वाद नेहमीच होत असल्याने पीडित पत्नी आपल्या मुलासह पती पासून विभक्त झाली. पीडित पत्नी 2023 रोजी माहेरी राहायला गेली. त्यानंतर 2024 मध्ये या महिलेने पतीकडून पोटगी मिळावी यासाठी कौटुंबिक न्यायालयात धाव घेतली. सध्या त्यांचे हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. 

ट्रेंडिंग बातमी -  Crime News: बीडपेक्षा सिंधुदुर्ग भयानक? खून केला, मृतदेह जाळला, 2 वर्षानंतर पर्दाफाश झाला, बोट राणेंकडे?

दरम्यान पीडित पत्नी 1 जून 2024 रोजी आपले साहित्य घेण्यासाठी पतीच्या घरी गेली होती. त्यावेळी ती पतीच्या फ्लॅटमध्ये गेलीय त्यावेळी तिचा पती दारूच्या नशेत होता. त्याने तिला घरातले कुठलेही साहित्य देण्यास नकार दिला. तिला मुलांची पुस्तकं आणि इतर साहित्य हवं होतं. त्याच वेळी त्याने पत्नीच्या गळ्यावर कोयता ठेवला. त्यानंतर तिच्यावर मना विरुद्ध शरीरसंबंध ठेवले. जीव वाचवण्यासाठी तिने आरडाओरडा केला नाही. विशेष म्हणजे त्याच वेळी त्या बिल्डींगखाली तिचे काही नातेवाईक ही होते.  

ट्रेंडिंग बातमी - Cabinet Meeting: यापुढे कोठडीत मृत्यू झाल्यास... राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 7 मोठे निर्णय!

अत्याचारा करत असताना, तुला घटस्फोट हवा आहे का ? पोटगी पाहिजे काय ? थांब तुला वेडीच करतो, मग कशी पोटगी मागशील ? असं म्हणत त्याने तिच्या गुप्तांगावर हळदी कुंकू लावलेले लिंबू पिळले. यावर पत्नी घाबरली. जर तू याबाबत कोणाला सांगितलं तर तुला ठार मारेल अशी धमकी ही त्याने दिली. असं पीडित पत्नीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. ही तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिस आता या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. सांगवी पोलीसांनी याची गंभीर दखल घेतली असून पुढील तपास केला जात आहे.