पुण्यात घृणास्पद कृत्य! पत्नीच्या गुप्तांगाला कुलूप लावलं; चावी हरवल्याने किळसवाणा प्रकार उघड

पुण्यातून अत्यंत घृणास्पद प्रकार समोर आला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
पुणे:

प्रतिनिधी, सुरज कसबे

पती-पत्नीमधील संशयातून धक्कादायक प्रकार समोर येत असतात. अनेकदा एकमेकांचा जीव घेण्यापासून आत्महत्या करण्यापर्यंत पती-पत्नीची मजल जाते. आता तर पुण्यातून अत्यंत घृणास्पद प्रकार समोर आला आहे. 28 वर्षीय पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत 30 वर्षीय पतीने अत्यंत विकृत कृत्य केलं आहे. पत्नीच्या गुप्तांगाला पतीने कुलूप लावून विकृत मानसिकतेचा कळस गाठणारी घटना पुण्यातील पिंपरी-चिंचवडमधून उघडकीस आली आहे. 

आता कुलपाची चावी मिळत नसल्याने पीडित महिला गेल्या 24 तासांपासून वेदनेने विव्हळत आहे. वाकड पोलिसांकडून या प्रकरणात तपास सुरू आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधित पतीविरोधात गुन्हे दाखल करीत पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. हा प्रकार पाहून पोलिसही चक्रावले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या पतीचा पत्नीवर संशय होता. यातून त्याने पत्नीच्या गुप्तांगाला कुलूप लावल्याचा किळसवाणा प्रकार केला. त्यात कुलूपाची चावी सापडत नसल्याने पीडित महिलेला अत्यंत वेदना सहन करावा लागत असल्याचे हा किळसवाणा प्रकार समोर आला आहे. कुलपाची चावी मिळत नसल्याने पीडित महिला मागील 24 तासांपासून वेदनेने विवळत आहे. वाकड पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे. 

Advertisement

नक्की वाचा - धक्कादायक! 8 वर्षीय चिमुकलीवर घरात घुसून 65 वर्षीय वृद्धाचा अत्याचार

पुण्यातून विकृत मानसिकतेचा कळस गाठणारी घटना समोर आली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीने पत्नीच्या गुप्तांगाला कुलूप लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकाराने मोठी खळबळ उडाली आहे. पतीवर गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, पिंपरी चिंचवडमध्ये 28 वर्षीय पत्नीच्या चारित्र्यावर पती सतत संशय घेत होती. यातूनच त्याने विकृतीचा कळस गाठत पत्नीच्या गुप्तांगाला कुलूप लावल्याचा प्रकार घडलाय. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पतीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून कुलुपाची चावीचा शोध घेतला जात आहे.

Advertisement

धक्कादायक बाब म्हणजे घटनेला 24 तास उलटून गेले असतानाही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे. मात्र पीडित महिलेच्या गुप्तांगाला लावलेले पितळ्याचं कुलूप चावी नसल्याने डॉक्टरांना काढता येत नाहीय. त्यामुळे अतीव वेदनेने पीडित महिला अजूनही विव्हळत आहे. जखमी महिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी गंभीर दखल घेत संबधित पती विरुद्ध भादवी 326,506 आणि 323 नुसार गुन्हे दाखल करत त्याला अटक केली आहे.

Advertisement