गुन्ह्यांच्या हब होत चाललेल्या पुण्यातील (Pune Crime) एका घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. मूळचा बीडचा असलेल्या शिवदास गीते याने राहत्या घरात पत्नी ज्योती गिते हिच्यावर शिलाई मशीनच्या कात्रीने (Killed Wife) गळा चिरला. आपल्या पोटच्या लहानग्या मुलासमोर त्याने पत्नीला जीवे मारलं. खोलीभर रक्ताचा पाट वाहत होता. अंथरूण रक्ताने माखलं होतं. तो इतक्यावरच थांबला नाही. तर त्याने आपल्या मोबाइलने मृत पत्नीचा व्हिडिओ केला. व्हिडिओ शूट करताना तो वारंवार एकाच गोष्टीचा उल्लेख करत होता... तुला मला मारायचं होतं, तू मला मारण्याचा प्लान करीत होतीस... ती लक्ष्मी होती... तिला मारायलं नव्हतं... पण तू माझ्यापुढं काहीच पर्याय ठेवला नाहीस... हा सर्व प्रकार त्यांचा लहानगा मुलगा शेजारी एका खुर्चीवर बसून पाहत होता.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा)
हा व्हिडिओ अत्यंत भीषण आणि अंगावर काटा आणणारा आहे. हा प्रकार पुण्यातील खराडीतील तुळजाभवानीनगर परिसरात घडला आहे. बुधवारी २२ जानेवारी रोजी पहाटे हा प्रकार घडला. शिवदास गिते हा मूळचा बीड येथील असून न्यायालयात टंकलेखक आहे. खडकी भागात तो भाडेतत्त्वावर खोली घेऊन राहत होता. शिवदास गिते हा मूळचा बीड येथील असून न्यायालयात टंकलेखक आहे. खडकी भागात तो भाडेतत्त्वावर खोली घेऊन राहत होता. काही दिवसांपासून या दाम्पत्यात कौटुंबिक कारणावरून वाद सुरू होता. बुधवारी पहाटे त्यांच्यात वाद झाला आणि त्यानंतर शिवदासने घरातील शिलाई मशीनच्या कात्रीने ज्योतीच्या गळ्यावर कात्रीने वार केले. यानंतर घरभर रक्त पसरलं होतं. शेजारच्या तक्रारीनंतर खराडी पोलिसांनी ज्योतीला तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, शिवदास गीते याला पोलिसांनी अटक केली आहे.
नक्की वाचा - Bangladeshi illegal immigration : बांगलादेशी महिलेला लाडकी बहीण योजनेचा लाभ
पती व्हिडिओमध्ये काय म्हणाला?
ही लक्ष्मी होती माझ्यासाठी. पण तिची लक्षणं बरी नव्हती. स्वत:च्या संरक्षणासाठी माझ्यावर इतकं वाईट करण्याची वेळ आली. ती मला मारण्याचा प्रयत्न करीत होती. तिचे भाऊ, माझे मेव्हणे त्यांनीही मला मारण्याचा प्रयत्न केला. ही एका मुलाची आई आहे. पण मुलाच्या भविष्यासाठी, स्वत:साठी मी हिला मारलं... हिने पुण्यात माणसं पेरली होती. ... घरकाम करायला जाते सांगून माझ्या हत्येचा प्लान करीत होती... या लेकराचा काय गुन्हा हाय...हे वासरू... त्यालाही मारायचा विचार केला असेल तिने...
खानदान संपविण्यासाठी. म्हणून माझा नाईलाज होता... करावं लागलं.. नरडं कोरडं पडलंय झालं...मला हिला मारायची इच्छा नव्हती...मी वाईट हेतून कधीच काही केलं नाही.. माझा हेतू वाईट नव्हता.. मी हिला सांभाळलं असतं...मी स्वत:च्या रक्षणासाठी हे केलं. मी आतापर्यंत कोणताही गुन्हा केलेला नाही.. पण हिची माहेरची लोक गुंड प्रवृत्तीची आहेत.