
अमजद खान
एका सहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर एका तरुणाने बलात्कार केल्याचा आरोप झाला होता. पोलिसांनी त्याला अटक केली. जवळपास सहा वर्षे तो तरुण तुरुंगात होता. अखेर या प्रकरणाचा निकाल सहा वर्षांनी कोर्टात लागला. कोणत्याही प्रकारचा साक्षी पुरावा नसल्याने अल्ताफ खान नावाच्या या तरुणाची कल्याण न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. सहा वर्षानंतर अल्ताफ हा जेलमधून बाहेर आला. आपल्या मुलाला न्यायालयाने निर्दोष सोडले हे ऐकून त्याची आई न्यायालयात बेशुद्ध पडली. लिफ्ट टेक्निशियन असलेल्या या तरुणाला सहा वर्षे तुरुंगात काढावी लागली. शेजारी राहणाऱ्या महिलेसोबत घर भाड्यावरुन वाद सुरु होता. या वादाचा राग काढण्यासाठी ही केस दाखल करण्यात आल्याचे वकिलांनी सांगितले. या प्रकरणामुळे एका तरुणाच्या जीवनातील सहा वर्षे वाया गेली. त्याला तुरुगांतल्या यातना भोगाव्या लागल्या.
कल्याण पश्चिमेतील वालधूनी परिसरात जानेवारी2020 मध्ये एक प्रकरण घडले होते. एका महिलेने आरोप केला होता की, शेजारी राहणाऱ्या तरुणाने तिच्या सहा वर्षाच्या मुलीवर अतिप्रसंग केला. हा प्रकार अल्ताफ खान या तरुणाने केला आहे असा आरोप त्यांनी केला होता. मुलीला घरात बोलावून त्याने अतिप्रसंग केल्याचा आरोप त्याच्यावर झाला. महात्मा फुले पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला. आरोपी अल्ताफ खान याला अटक केली होती. अल्ताफच्या कुटुंबीयांचे म्हणणे होते की, तो निर्दोष आहे. त्याने काही केलेले नाही. ज्या दिवशी घटना घडल्याचे सांगितले गेले, त्यादिवशी आम्ही सगळे घरीच होतो. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. एकीकडे तपास सुरु असताना अलताफला जामीन मिळविण्यासाठी वकिलांनी प्रयत्न केले. कोविडच्या काळ सुरु होता. अल्ताफच्या वकिलांनी त्याला जामीन मिळवण्यासाठी कल्याण कोर्टात अर्ज केला. कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने त्याच्या जामीन अर्ज दोन वेळा फेटाळला. उच्च न्यायालयानेही त्याचा जामीन अर्ज दोन वेळा फेटाळला.
नक्की वाचा - Thane News: नाल्यात सापडले महिलेचे मुंडके, खुनाचे रहस्य पोलिस उलगडणार
जलद गती न्यायालयात हा खटला चालविण्याचे आदेश दिले गेले. तरी देखील या प्रकरणाला 5 वर्षे 8 महिने उलटले. अखेर या प्रकरणाची सुनावणी झाली. अल्ताफच्या वतीने वकिल गणेश घोलप यांनी न्यायालयात बाजू मांडली. अल्ताफचे वडील अर्धांगवायूच्या आजाराने बिछान्यावर खिळून आहेत. अल्ताफची आई मुलाला सोडविण्यासाठी न्यायालयाच्या चकरा मारत होती. कल्याण जिल्हा न्यायालयातील विशेष पोक्सा न्यायालयाच्या न्यायाधीश व्ही. एन. पत्रावळे यांनी निकाल दिला. अल्ताफच्या विरोधात साक्षी पुरावे नव्हते. त्याची निर्दोष मुक्तता केली गेली. जवळपास सहा वर्षानंतर तो तुरुंगात बाहेर आला. वयाच्या 22 व्या वर्षी तो तुरुंगात गेला होता. तो लिफ्ट टेक्निशीयन आहे. आत्ता तो बाहेर आला आहे.
Manoj Jarange Patil Maratha Morcha : मराठा आंदोलनादरम्यान हळहळ! आणखी एका मराठा बांधवाचा मृत्यू
त्याच्या तरुणपणाची सहा वर्षे वाया गेली. त्याला यातना भोगाव्या लागल्या. वकिल घोलप याने सांगितले की, अल्ताफ याचा वडिलांचे शेजारच्या महिलेशी घर भाडयावरुन वाद सुरु होता. या वादाच्या रागातून त्या महिलेने अल्ताफच्या विरोधात केस केली. जेव्हा आरोपीच्या समोर पिडीत मुलीला आणले गेले. मुलीने आरोपीला ओळखले सुद्धा नाही. तक्रार ही मुलीच्या आईने दिली होती असे डॉक्टरने देखील नमूद केले होते. ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी अल्ताफ वालधूनी परिसरात नव्हता. न्यायालयाने निकाल दिला आहे. अखेर न्याय मिळतो हे सिद्ध झाले आहे. अल्ताफ याने सांगितले की, निकालानंतर आत्ता मी पुढील आयुष्य जगणार आहे. विशेष म्हणजे न्यायालयाने अल्ताफ ला निर्दोष मुक्त केले. त्यावेळी त्याची आई न्यायालयातच बेशुद्ध पडली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world