
पिंपरी चिंचवडमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरातील एका नामांकीत महाविद्यालयात एकत्र शिकणाऱ्या मित्रांनी त्यांच्याच एका मित्राचा घात केला. त्याचा नग्न अवस्थेतील व्हिडिओ काढून तो व्हायरल करण्याची त्याला धमकी दिली. शिवाय त्याच्याकडून 50,000 रुपयांची मागणी ही केली. बदनामी होईल या भीतीने त्या तरुणाने आत्महत्ये सारखा मार्ग स्विकारला. तो तरूण 21 वर्षाचा होता. पोलीसांनी आत्महत्येचा शोध घेताना त्यांच्या समोर काही धक्कादायक बाजी चौकशीत समोर आल्या. त्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपरी शहरातील एका नामांकित शिक्षण संस्थेत अभियांत्रिकीचे शिक्षण हा विद्यार्थी घेत होता. त्याचे या महाविद्यालायता 5 ते 6 मित्र होते. त्यांनी एका मित्राला ग्रींडर गे ऍप वर बनावट अकाउंट वरून संपर्क साधला. त्यानंतर त्याला रूम वर बोवून घेतले. नंतर त्याचे आणि अन्य एका व्यक्तीचे नको त्या अवस्थेतील फोटो आणि व्हिडिओ काढले. त्या नंतर सर्वांनी मिळून त्या मित्राला ब्लॅकमेल करायला सुरवात केली.
ट्रेंडिंग बातमी - Crime News: सेल्फीमुळे पकडला गेला चोर, उपमुख्यमंत्र्यांच्या समोरच साधत होता डाव
ब्लॅकमेल करण्या बरोबरच त्याच्याकडून 50 हजार रुपयांची ही मागणी केली. जर ते दिले नाही तर संबंधित फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करू अशी धमकी दिली. फोटो व्हिडीओ व्हायरल झाले तर आपली बदनामी होईल याने तो तरुण घाबरून गेला होता. काय करावे हे त्याला सुचत नव्हते. शेवटी त्याने टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. घाबरलेल्या अवस्थेत तो तरूण पिंपरी चिंचवड शहरातील संत तुकाराम नगर मेट्रो स्टेशन वरील पुलावर गेला. तिथूनच खाली उडी मारून त्याने आत्महत्या केली.
घटनेत मरण पावलेल्या मुलाने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या एका नातेवाईकाकडे 50 हजार रुपयांची मागणी केली होती. ते पैसे तो कुणाला देणार होता, याचा शोध घेत असताना हा गुन्हा उघडकीस आला. दरम्यान या गुन्ह्यातील आरोपी विद्यार्थ्यांच्या टोळक्याने अशाच प्रकारे अनेक विद्यार्थ्यांना देखील ब्लॅकमेल केल असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे त्या दिशेने तपास सुरू केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. या प्रकरणी पिंपरी पोलिसांनी 3 आरोपी विद्यार्थ्यांना अटक केली आहे. इतर आरोपींचा ते शोध घेत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world