Pune Crime: पुण्यात धाडसी दरोडा! प्लास्टिकची बंदूक घेऊन आले, 2 मिनिटात 25 तोळे सोने पळवले..

पुण्यामधून आणखी एक हादरवुन टाकणारे प्रकरण समोर आले असून चक्क खेळण्यातील बंदूक दाखवत 25 तोळे सोने लुटल्याची घटना घडली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

रेवती हिंगवे, पुणे: विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाणारे पुणे शहर गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी घटनांमुळे चर्चेत आहे. पुण्यात खून, दरोडे, मारामारी अन् कोयता गँगच्या दहशतीचे प्रकार समोर येत आहेत. अशातच आता पुण्यामधून आणखी एक हादरवुन टाकणारे प्रकरण समोर आले असून चक्क खेळण्यातील बंदूक दाखवत 25 तोळे सोने लुटल्याची घटना घडली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुण्यातील सिंहगड रोड परिसरात भर दिवसा दरोडा टाकल्याचे उघडकीस आले आहे. सिंहगड रस्त्यावर असलेल्या ज्वेलर्सच्या दुकानात हा दरोडा टाकण्यात आला असून बंदुकीचा धाक दाखवत 25 ते 30 तोळे सोने लंपास केले. तीन जणांनी हा दरोडा टाकला. धक्कादायक म्हणजे ही बंदूक खेळण्यातील असल्याचेही समोर आले आहे. 

दरोडा टाकलेले हे तीनही आरोपी सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने दुकानात आले होते. दुकानात आल्यानंतर त्यांनी सोबत आणलेली प्लास्टिकची बंदूक दाखवत दुकानात दरोडा टाकला. यावेळी त्यांनी 25- 30 तोळे सोने लंपास केले अन् पळ काढला. चोरी केल्यानंतर तीनही आरोपी फरार झाले. नांदेड सिटी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील धायरी परिसरात घडलेल्या या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

ट्रेंडिंग बातमी -  Crime News: बीडपेक्षा सिंधुदुर्ग भयानक? खून केला, मृतदेह जाळला, 2 वर्षानंतर पर्दाफाश झाला, बोट राणेंकडे?

दरम्यान फ्लॅटच्या बुकिंगची रक्कम परत मागितल्याचा राग मनात ठेवत तरुणाकडून थेट कोयत्याने दहशत माजवल्याचाही प्रकार पुण्यामधून समोर आला आहे. हातात लांबलचक कोयता फिरवत दहशत, थरकाप उडवणारा पुण्यातील व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. याप्रकरणी 29 वर्षीय व्यक्तीने यासंदर्भात उत्तम नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे तसेच ऋषिकेश भगवान गायकवाड या तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - गाडीत मृतदेह? धावत्या कारमधील लटकलेला हात कुणाचा? 'त्या' VIDEOचे धक्कादायक सत्य

Topics mentioned in this article