यशपाल सोनकांबळे, पुणे:
Pune Ketan Agrawal Murder Case: पुण्यातील केतन अग्रवाल खून प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. केतनची होणारी पत्नी सिया आणि तिचा प्रियकर चेतनने अत्यंत निर्घृणपणे केतनची हत्या केली. पोलिसांच्या तपासात दोन्ही आरोपींनी अत्यंत थंड डोक्याने हा संपूर्ण कट रचल्याचे उघड झाले आहे. अशातच आता या प्रकरणात आणखी एक शॉकिंग खुलासा झाला असून केतनच्या हत्येआधी दोन्ही आरोपींनी रंगीत तालीम केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
हत्या कशी करावी? Google वर शोधलं
समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी हत्या करण्याच्या पद्धतींबाबत गुगलवर शोध घेतल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. केतनला विष देऊन किंवा किल्ल्यावरून दरीत ढकलून हत्या कशी करता येईल, यासंदर्भात ऑनलाइन माहिती शोधल्याचे तपासात उघड झालं आहे. आरोपींकडून लोहगड किल्ल्यावर अशी जागा शोधण्यात आली, जिथून ढकलल्यास तो अपघात वाटेल. तसेच घटनेपूर्वी आरोपींनी कटाची सविस्तर आखणी केल्याचे तपासातून समोर आले. सिया खाली बसल्यानंतर चेतनने केतनला धक्का द्यायचा असा प्लॅन ठरल्याचेही उघड झाले आहे.
केतनला मारण्याआधी रंगीत तालीम,
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी हत्येपूर्वी लोहगड किल्ल्यावर जाऊन रंगीत तालीम केल्याचा पोलिसांचा दावा आहे. १४ जून रोजी केतनच्या हत्येचा पहिला प्रयत्न झाल्याचे तपासात समोर आले आहे. हत्येनंतर पोलिसांच्या चौकशीला काय उत्तरे द्यायची याचाही आरोपींनी आधीच सराव केल्याचा दावा करण्यात आले आहे. तसेच संशय टाळण्यासाठी वेषांतराची योजना आखल्याचे, घटनेनंतरचे चॅट आणि डिजिटल पुरावे डिलीट करण्याचा प्रयत्न झाल्याचेही समोर आले आहे. पुणे ग्रामीण पोलीस डिजिटल आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
दरम्यान, आज लोहगड किल्ल्यावर पहाटेपासून फॉरेन्सिक आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरीच्या उपस्थित सीन रिक्रिएशन करत आहे. घटनास्थळावरून रक्त, त्वचा आणि इतर जैविक नमुने संकलित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. केतन अग्रवालचा खून नेमका कसा करण्यात आला, याची प्रत्यक्ष पडताळणी सुरू आहे. तसेच ज्या ठिकाणावरून केतनला दरीत ढकलल्याचा संशय आहे, त्या ठिकाणी फॉरेन्सिक पथक तपास करत आहे. घटनास्थळावरील प्रत्येक बाबीची बारकाईने तपासणी करत पुरावे पडताळले जात आहेत. सीन रिक्रिएशन आणि फॉरेन्सिक तपासाच्या आधारे पुढील तपासाला महत्त्वाची दिशा मिळण्याची शक्यता आहे.
Sangli Crime: सिया-चेतन पेक्षाही डेंजर! लव्ह मॅरेज केलं त्यालाच छाताडावर बसून संपवलं, सांगलीत खळबळ
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world