Pune News : सिम्बायोसिसमधील BBA च्या 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू; पुण्याला परतत असताना झाला भयंकर अपघात

हा अपघात इतका भीषण होता की, गाडी चक्काचूर झालाय. अपघात झाला त्यावेळी आणखी दोन विद्यार्थी कारमध्ये होते. सुदैवाने ते बचावले आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

सुरज कसबे, प्रतिनिधी

मावळ तालुक्यातील देहूरोड बायपासवर पुणे-बंगळूर महामार्गावर आज पहाटे झालेल्या एका भीषण अपघातात सिम्बायोसिस कॉलेजच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यांची भरधाव स्विफ्ट कार कंटेनरवर आदळल्याने हा अपघात घडला. या अपघातात आणखी दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पहाटेच्या सुमारास हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे. हा अपघात इतका भीषण होता की, गाडी अक्षरश: चक्काचूर झाली. 

आज गुरुवारी, 18 सप्टेंबर रोजी सकाळी पावणे सहा वाजेच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली आहे. सिम्बायोसिस कॉलेजचे चार विद्यार्थी काल रात्री लोणावळ्याला फिरायला गेले होते. परत येताना त्यांची स्विफ्ट कार देहूरोड बायपासवर असताना समोरील एका कंटेनरवर जोरात आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, कारचा पुढचा भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. या अपघातात सिद्धांत आनंद आणि दिव्यराज सिंह राठोड या दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेले अन्य दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

नक्की वाचा - Akola News : नामांकित पेट्रोल पंपावर ग्राहकांची मोठी फसवणूक, गाड्या जागीच बंद झाल्याने धक्कादायक प्रकार उघड

गाडीचा स्पीड जास्त असल्याचं सांगितलं जात आहे. कार चालकाला डुलकी लागली की नेमकं काय झालं याबाबत तपास केला जात आहे. अपघात झाला त्यावेळी कारमध्ये दिव्य राज सिंग प्रेम सिंग राठोड (वय २० वर्ष), सिद्धांत आनंद शेखर (वय २० वर्ष) हे दोघेही अपघातात जागीच मृत्यू पावलेले आहेत. याशिवाय हर्ष मिश्रा (वय २१ वर्ष), निहार तांबोळी (२० वय वर्षे) हे किरकोळ जखमी झाले आहे. त्यांच्यावर लाईफ लाईन हॉस्पिटल वाकड येथे उपचार सुरू आहे. स्विफ्ट डिझायर कारमधील मुले सिम्बॉयसिस कॉलेजच्या BBA ला शिकत होते. ते लोणावळा येथे फिरायला गेले होते. पहाटे परत येत असताना अपघात झाला. या घटनेतील आयशर कंटेनर चालक मनीष कुमार सुरज मणिपाल (39 वर्षे) वडाळा येथील राहणारा असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. 

Advertisement
Topics mentioned in this article