जाहिरात

Pune News: एकाच कंपनीत काम, प्रेमविवाह अन् अखेर करुण अंत! पुण्यात IT इंजिनिअरची असह्य छळाला कंटाळून आत्महत्या

Pune News: पुण्यातील सिंहगड रोड परिसरात 27 वर्षीय महिला आयटी इंजिनिअरने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. पती आणि सासूकडून होणाऱ्या मानसिक छळाला कंटाळून तिने हे पाऊल उचलल्याचा आरोप आहे.

Pune News: एकाच कंपनीत काम, प्रेमविवाह अन् अखेर करुण अंत! पुण्यात IT इंजिनिअरची असह्य छळाला कंटाळून आत्महत्या
"Pune News: 27 वर्षीय इंजिनिअर महिलेने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली"
प्रतिकात्मक फोटो Canva

Pune News: पुण्यातून एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. एका 27 वर्षीय महिला आयटी इंजिनिअरला लग्नानंतर मूल होत नसल्याने सासरच्या जाचाला सामोरे जावे लागले. पती आणि सासूकडून सतत मिळणारे टोमणे आणि होणाऱ्या मानसिक छळाला कंटाळून अखेर या तरुणीने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारत आपले जीवन संपवले. दीप्ती एकशिंगे असे मृत महिलेचे नाव असून ही घटना सिंहगड रोड परिसरातील आहे.  

मूल होत नसल्याने सासरच्या मंडळींकडून जाच 

मूल होत नसल्याच्या कारणावरून सतत होणाऱ्या छळाला कंटाळून 27 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेने कथित स्वरुपात आत्महत्या केली आहे. याप्रकरणी पती, सासू आणि अन्य नातेवाईकांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीप्ती एकशिंगे सिंहगड रोड परिसरातील माणिक बाग येथील रहिवासी होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 जून रोजी तिने  निवासी इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली.

(नक्की वाचा : Pune News: पुणेकरांचं आरोग्य धोक्यात! "भयंकर महामारी वाट पाहतेय", उद्योगपतीची पोस्ट चर्चेत)

भावाने पोलिसात तक्रार केली दाखल

या प्रकरणी गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथील रहिवासी असलेले तिचे भाऊ डॉ. किरण दुधबळे यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दीप्तीचा पती प्रदीप एकशिंगे, सासू सुरेखा एकशिंगेसह इतर नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. एफआयआर (FIR) नुसार, एकाच आयटी कंपनीत काम करत असताना दीप्ती आणि प्रदीप यांची भेट झाली होती. त्यांच्या व्यावसायिक ओळखीचे रूपांतर पुढे प्रेमात झाले आणि 17 नोव्हेंबर 2024 रोजी पुण्यात त्यांचा विवाह झाला.

तक्रारदाराने असा आरोप केला आहे की, लग्नानंतर दीप्तीला मूल होत नसल्याच्या कारणावरून पती, सासू आणि कुटुंबातील इतर सदस्यांकडून वारंवार मानसिक छळ आणि टोमणे सहन करावे लागत होते. या सततच्या छळामुळे ती मानसिक तणावाखाली होती, ज्यातून अखेर तिने हे टोकाचे पाऊल उचलले.

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com