- रेवती हिंगवे, प्रतिनिधी
Pune News: पुण्यातील कात्रज परिसरामध्ये वाहनांची तोडफोड करणाऱ्यांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. दोन जण काही दिवसांपूर्वी वाहनांची तोडफोड करून पसार झाले होते. ज्या ठिकाणी गाड्या फोडल्या त्याच ठिकाणी पोलिसांनी आरोपींची धिंड काढली.
नेमके काय आहे प्रकरण?
आंबोगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत 26 नोव्हेंबर 2025 रोजी उत्तररात्री अंदाजे 2 वाजता कात्रज येथील सच्चाई माता मंदिर परिसरात पार्क करण्यात आलेल्या रिक्षा आणि टेम्पोची धारदार शस्त्राने तोडफोड करण्यात आली. याप्रकरणी नितेश नितीन सवाने (वय 25 वर्षे) आणि अजय नामदेव खंडागळे (वय 19 वर्षे) या दोघांना पोलिसांनी अटक केलीय.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही आरोपी एकमेकांचे मावसभाऊ आहेत. दोघांमध्ये किरकोळ कारणावरुन भांडण झालं होतं, यानंतर एकाने रस्त्यावरील वाहनांचं नुकसान केलं. आंबेगाव पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे.
पुण्यामध्ये आधीच कोयता गँगची दहशत आहे, त्यामध्ये अशा घटनांमुळे स्थानिकांच्या भीतीमध्ये अधिकच भर पडतेय. अशा घटनांना न घाबरता तक्रारी करण्याचं आवाहनही पोलिसांनी केलंय.
(नक्की वाचा: Pune Viral Video: सिगारेटचे पैसे मागितले, फुकट्या ग्राहकाने कोयता काढला अन्... पुणेकरांमध्ये मोठी दहशत)
पाहा व्हिडीओ | VIDEO
(नक्की वाचा: Pune News: मला माणसासारखं वागवलंच नाही, तरुणाने पुणे पोलिसांना दिला तळतळाट, VIDEOद्वारे समोर आणला क्रूर चेहरा)