जाहिरात

Pune Viral Video: सिगारेटचे पैसे मागितले, फुकट्या ग्राहकाने कोयता काढला अन्... पुणेकरांमध्ये मोठी दहशत

Pune Viral Video: पुण्यातील विमाननगर परिसरामध्ये घडलेल्या घटनेमुळे स्थानिकांमध्ये मोठी दहशत निर्माण झालीय.

Pune Viral Video: सिगारेटचे पैसे मागितले, फुकट्या ग्राहकाने कोयता काढला अन्... पुणेकरांमध्ये मोठी दहशत
"Pune Viral Video: पुण्यात कोयता गँगची दहशत"
NDTV Marathi

- रेवती हिंगवे, प्रतिनिधी

Pune Viral Video: पुण्यातील वाढत्या गुन्हेगारी प्रकरणांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालंय. पुण्यामध्ये कोयता गँगची दहशत सुरूच आहे. पुण्याच्या विमाननगर परिसरातील धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.  

पुण्याच्या व्हायरल व्हिडीओमध्ये नेमकं आहे तरी काय?

एका पान टपरीवर पाच ते सहा जणांची टोळी येऊन सिगारेट विकत घेते. सिगारेटचे पैसे मागितल्यानंतर टोळीतील एकाने कोयता बाहेर काढून दुकानाची तोडफोड करायला सुरुवात केली. दुकानातील सामान अस्तव्यस्त केले. दहशत निर्माण करुन त्याने सिगारेटचं पाकिटही चोरूलं. विमाननगर परिसरातील पान टपरी चालकावर झालेल्या हल्ल्यामुळे खळबळ उडालीय. प्राथमिक माहितीनुसार सामान फुकट मिळवण्याच्या उद्देशाने हा हल्ला करण्यात आल्याचे म्हटलं जातंय. 

व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण

आरोपींमध्ये काही अल्पवयीन मुलांचा समावेश असल्याची माहिती समोर आलीय. घटनेनंतर व्यापारी आणि स्थानिकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झालंय. संबंधित गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी स्थानिकांकडून केली जातेय. 

(नक्की वाचा: Pune News: त्या अफवेने पुण्याच्या लष्कर भागात स्थानिकांमध्ये प्रचंड भीती, खळबळ उडाल्याने पोलिसांचं मोठं आवाहन)

कोयता काढला अन्... पाहा व्हिडीओ
Listen to the latest songs, only on JioSaavn.com